सकारत्मतक दृष्टिकोन ठेवा- डॉ आर एस अवस्ती

 सकारत्मतक दृष्टिकोन ठेवा- डॉ आर एस अवस्ती




           औसा (प्रतिनिधी ): रेणापूर येथील शिवाजी  महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ लातूर जिल्हा आजादी महोत्सव चे अध्यक्ष डॉ.आर . एस. अवस्ती यांनी विध्यार्थ्यांना  संवाद सादत  असताना विधार्थ्याना सकारत्मक दृष्टिकोन ठेवणं गरजेचे आहे त्याच बरोबर करिअर संदर्भात जागृत रहा ,मोठे  स्वप्न पहा  जीवनात यशस्वी व्हा,  जीवनात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडे ज्ञान असलं पाहिजे ज्ञान नसेल तर तुमच्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही .असे मोलाचे मार्गदर्शन केले.        

            श्री वेताळेश्वर  शिक्षण संस्था अंतर्गत, लातुर कॉलेज ऑफ फार्मसी  हासेगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आजादी महोत्सव निमित्त कार्यशाळा घेण्यात आली. व बी फार्मसी प्रथम  वर्षातील नूतन  विद्यार्थ्यां च्या स्वागत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.  या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमे ची पूजन करुन मान्यवरांचा सत्कार सोहळा करून संपन्न झाला . 

           या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  रेणापूर येथील शिवाजी  महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ चे लातूर जिल्हा आजादी मुहोत्सव चे अध्यक्ष   डॉ.आर . एस. अवस्ती, लातूर येथील श्री  मुकेश बिदाद  ,श्री उत्तम जेवळे , श्री वेताळेश्वर  शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर अप्पा बावगे  संस्थेचे  सचिव श्री वेताळेश्वर बावगे  संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जी जेवळे,  प्राचार्या डॉ. श्यामलीला बावगे, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्याध्यापक   श्री कालिदास गोरे आदी मंच्यावर  उपस्थित होते.

                या कार्यक्रमाची प्रास्ताविक पर भाषण प्राचार्य डॉ श्यामलीला बावगे यांनी केले तर  कॉन्टिटी पैक्षा  कॉलिटीला महत्व द्या आणि एन्जॉय करत शिक्षण घेण्यापैक्षा शिक्षण गेत एन्जॉय करा आणि आपला जीवनातील गोल प्राप्त करा , श्री वेताळेश्वर  शिक्षण संस्थेचे  श्री वेताळेश्वर बावगे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर  संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जी जेवळे यांनी हि आपले मत व्यक्त केले . 

          या कार्यक्रमाला सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विध्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. बालाजी खवले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या