लातुरातुन मुस्लिम आरक्षणाची मुहूर्तमेढ ठेवणारा खरा योध्दा..
------------------------------------
२४ जानेवारी २००५ हा दिवस स्व: महेबुब पाशा शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली .. मुस्लिम आंदोलन चळवळीचे मुख्य मार्गदर्शक मुस्लिमांच्या आरक्षण मागणीचे जनक मुस्लिम समाजाच्या मनात राष्ट्रीय भावना व क्रांतिकारी आंदोलने उभे करण्यासाठी समाजहित जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणजे युवकांना प्रेरणा देणारे स्व:महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी लातूर च्या भुमीतुन महाराष्ट्र भर मुस्लिम आरक्षाणाच आवाज उठवला ते मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा.वहिदाभाभी यांचे पती होते ते शासकीय सेवेत असल्याने त्यांनी पडद्याआड भुमिका पार पाडली ते फक्त मोजक्या लोकांना माहीत होते मुस्लिम आरक्षण या मागणीसाठी आपल्या कुटुंबीयाला वेळ न देता समाजातील समस्या पाहता एकच विचार केला की या महाराष्ट्र राज्यात जर मुस्लिम समाज हा सुशिक्षित करावयाचा असेल तर शिक्षण महत्त्वाचे आहे आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही हे विचार जेव्हा त्यांच्या मनात बसले तेव्हा त्यांनी पोलीस दलातील शासकीय अधिकारी म्हणून काम करत असतांना आपल्या कार्यात कामात कसुर होता कामा नये हा विचार करून त्यांनी पत्नीला शासनावर दबाव गट निर्माण करण्यासाठी मुस्लिम विकास परिषदेच्या संघटनेची स्थापना केली मुस्लिम समाजातील दयनीय अवस्था पाहून मुस्लिम समाजाला राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे असेल तर शिक्षणाची जनजागृती करणे गरजेचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आणि यासाठी समाज संघटित करायचा असेल तर मुस्लिम सामाजिक संघटन महत्त्वाचे आहे हा विचार त्यांच्या मनात बसला व त्यांनी मुस्लिम विकास परिषद या नावाने सामाजिक संघटन काढले व संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा प्रा.वहिदाभाभी यांना पाठबळ दिले होते व मुस्लिम समाजातील होतकरू व गरजु यांना शिष्यवृत्ती व आरक्षण मिळावे या मागणी शासन दरबारी लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा सन २००१ साली लढा दिला स्व: महेबुब पाशा शेख यांच्या क्रांतीची ज्योत खा.असदुद्दीन ओवैसी यांनी हि धुरा आपल्या खाद्यावर घेतली आहे व राजकीय क्षेत्रात देशपातळीवर चर्चा सुरु झाली मुस्लिम आरक्षाचा इतिहास काय याविषयी जाणून घेऊ या स्व: महेबुब पाशा शेख यांचा जन्म एका छोट्या कुटुंबात झाला वडील पान विक्रेता तर आई गृहणी शिक्षणाची आवड पण मार्गदर्शन नाहीं तरी हि धाडस निर्णय निश्चय ठाम असायचा आझम गंजगोलाई येथे छोटासा पानाचा व्यापार करत अगदी जुने कपडे घालुन स्व: महेबुब पाशा शेख यांनी पुर्ण केले बीकॉम पदवी उत्तीर्ण व महाराष्ट्र लोकसेवा आयोग च्या परिक्षेतुन थेट पोलीस दलात दाखल झाले व प्रशिक्षण घेऊन जेव्हा लातूरात राजीव गांधी चौक येथे मित्र परिवार यांच्या कडुन त्यांचा सत्कार करण्यात आला आपण समाजातील प्रगती व उन्नती साठी काहि तरी करू हा विचार त्यांच्या मनात सतत असायचा जो संघर्ष त्यांनी केला तो असा की मुस्लिम शिष्यवृती नाही आरक्षण नाही जर मी शिक्षीत होवु शकतो तर माझ्या समाजाला का जागरूक करु नये हा विचार त्यांना सतत मनविचलीत होत असे तसे त्यांची पहली नियुक्ति उस्मानाबाद जिल्यातील अंबी या गावी झाली त्यानंतर वैवाहिक जिवन साथी ह्या सांगली जिल्यातील इस्लामपुर येथील निवड करण्यात आली प्रा.वहिदाभाभी यांच्याशी विवाह झाला त्यांचे शिक्षण हे M.Com GDC & A & Bped .पदवी घेतली पती पत्नी दोघेही उच्च पदवीधर शिक्षीत व सुशिक्षित होते उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापुर येथे स्व : महेबुब पाशा शेख हे शासकीय नौकरीत असल्याने काहि अनुभव यायला सुरवात झाली तेव्हा लगबग सन १९९३ साली बाबरी - मज्जिद चे प्रकरण संवेदनशील वातावरण व कारणात्सव निलंबित झाले पुन्हा लातुर शहरातील मक्का मज्जिद जवळ मित्र परिवार यांना सोबत घेवुन युवा जागृती अभीयान सुरू केले गरीब होतकरू यांना महाराष्ट्र आयोग ची तयारी व मार्गदर्शन सा.युवा जागृती वृतपत्र काढले त्यातून हि पहिला अंकाचे प्रकाशन हे आईच्या हस्ते केले पुढे सामाजिक उपकृम सामुहिक विवाह सोहळे आयोजित करून यशस्वी केले समाजात एक जनजागृती केली प्रा.वहिदाभाभी यांनी स्व: महेबुब पाशा शेख यांच्या निलंबित काळात डाँ. जाकिर हुसेन गौसपुरा या भागातील शाळेत नौकरी केली ते हि मित्र परिवार त्यांच्या सोबत होता मग लातुर नगर परिषद निवडणूकीत प्रा.वहिदाभाभी यांना दोन प्रभागात उभे केले तो म्हणजे झिंगणअप्पा गल्ली व तेली गल्ली येथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला कोणत्याही राजकीय पक्षाचे लेबल लावून घेतले नाही अपक्ष आणी दोन्ही विभागातुन विजय प्राप्त केल प्रा.वहिदाभाभी निवडुन आल्या पुन्हा त्यांनी खा.शबाना आझमी यांच्या हस्ते बँकेची स्थापना केली तर मुबंई येथे जाणे व मंत्रालयात राजकारणाच्या च्या नेत्यांना कींमत असते राजकारणा करण्यापेक्षा दबाव गट निर्मीण व्हावा असा विचार मनात नेहमी ठेवत असे त्या काळी भाजपा - शिवसेना यांची सत्ता व स्व : गोपीनाथ मुंडे गृहमंत्री होते त्यांनी पुन्हा परत सेवेत घेतले व तेही बीड येथे बशीरगंज येथे रुजू झाले तेथेही धाडसी स्वभाव असल्याने तेथेही सामाजिक समाज जागरूकता हि सतत त्यांना सतावत होती तेथून हि राजकीय नेत्यांना वढणीवर आणण्याचा भर तेथून हि बदली पुन्हा केज मतदार संघात तेथे हि स्व विमलताई मुंदडा या मंत्रीमंडळात उच्च शिक्षीत महिला तेथेही हि त्यांचे पति नंदु मुंदडा यांच्यात वाद जनसामान्य माणसाला न्याय देण्याची जणु काहि वृत्तीच त्यांच्या अंगी होती पुन्हा बदली औरंगाबाद येथे तेथे जेव्हा डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ संघर्ष व लोकशाही ची लढाई न्याय देवु शकते व संघटक संघटना यामुळे माझ्या समाजास मी काहि देवु शकतो हा विश्वास,ध्येय, स्वप्न, विचाराने मुस्लिम विकास परिषद या संघटनेचे सुरवात ०९ आँगस्ट २००० साली औरंगाबाद येथे पहिली बैंठक व शाखा व मेळाव्यातुन मुस्लिम समाजास शिष्यवृती व आरक्षण मिळावे या मागण्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन उभे केले ते हि स्व:ता शासकीय सेवेत असल्याने विश्वास कोनावर ठेवावा हा प्रश्न त्यांच्या समोर होता म्हणुन पत्नी प्रा.वहिदाभाभी ला पुढे केले मुस्लिम महिलेला बंधने आहेत याचा विचार न करता आंदोलन उभे केले तो भाग म्हणजे आज अंदाज लावु शकतोत की लढा हा सोपा नव्हता चळवळीने लोकशाही चा मार्ग दाखवला शासनाला सळो की पळो करून सोडले पोलीस उच्च अधीकारी सतत विचारायचे प्रा.वहिदाभाभी या तुमच्या पत्नी आहेत तेव्हा उत्तर द्यायचे तीला तीचे स्वांतत्र्य व अधीकार आहेत जगण्याचे सतत पोलीस प्रशासन राजकारण असा प्रवास होता पाहता पाहता संघटनेचे जाळे मराठवाड़ा भर गावोगावी शाखा मेळावे , समाजजागृती झाली पुन्हा बदली नांदेड़ येथे तेथे हि मुस्लिम विकास परिषदेचा प्रा.वहिदाभाभी यांच्यावर शासकीय नजर असायची पण संघर्षतुन संघर्षीकडे औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातुर, आन्ध्र, कर्नाटक येथे हि संघटना कार्य करू लागली जिकडे स्व : महेबुब पाशा तिकडे मुस्लिम विकास परिषद नांदेड हुन पुन्हा बदली देगलूर येथें तेथून स्व. गोपनाथ मुंडे यांनी विधानपरिषदेवर घेतोय फक्त भाजपा फाँर्म भरा म्हटले होते..? पण त्यालाहि झुमानले नाही मुस्लिम शिष्यवृती आरक्षण हाच मुद्दा घेऊन पुन्हा नांदेड़ महानगर पालिका निवडणूकीत कार्य केले अपक्ष मुस्लिम नगरसेवक यांना विजयी करा असे आवाहन केले शेवटच्या टप्यात मुस्लिम नगरसेवक निवडुण द्या आवाहन मुस्लिम नगरसेवक जास्त प्रमाणात निवडणूकीत निवडुन आले मुस्लिम महिला महापौर झाली हा इतिहास आहे नांदेड़ लोकसभेत निवडणूकीत बसपा कडुन देशातील पहली मायावती यांची सभा नांदेड येथे व उमेदवारी घोषीत हा इतिहास आहे प्रा.वहिदाभाभी सह मराठवाड्यातुन औरंगाबाद ,परभणी, बीड,लातुर, येथे हि उमेदवार दिले व नादेंड लोकसभा लढवली ३७८००/- च्या जवळ पास मते घेतली व माजीगृह मंत्री शंकरराव चव्हाण यांचे जावई माजी खा.भास्कर पाटिल यांचा पराभव केला तेव्हा मा.खा.डी .बी.पाटिल निवडणूकीत निवडुण आले तेव्हा प्रा.वहिदाभाभी यांचा पराभव नाहीं ज्यावेळी बाबरी मज्जिद ऊदवस्त झाली त्यावेळी देशाचे गृहमंत्री स्व : शंकरराव चव्हाण यांचा बदला हा त्यांच्या जावयाचा पराभव केला असे म्हणायचे ? पुन्हा बदली हिंगोली येथे पुन्हा विधायक निवडणूकीत प्रा.वहिदाभाभी मैदानात लातुर - स्व : विलासराव देशमुख भोकर - माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण ,औरंगाबाद - माजीमंत्री राजेंद्र Darda मुस्लिम समाजास शिष्यवृती आरक्षण द्या या मागण्यासाठी मराठवाड्यातुन १७ ठिकाणी उमेदवार सह मागणी अखेर माजी केद्रीय मंत्री स्व : विलासराव देशमुख यांनी सच्चर समीति अहवाल व महाराष्ट्र राज्यातून अल्पसंख्याक महामंडळ या अटीवर पत्रकार परिषद घेवुन माघार घेतली तेव्हां काँग्रेस आघाडीचे शासन आले आणी अल्पसंख्याक समाजास शिष्यवृती लागु झाली हा इतिहास आहे आरक्षण हि शासनाने लागु केले तेहि सत्तेवरुन जाता जाता ..पण टिकले नाही या मागे अहोरात्र दिवस शासकीय पोलीस दलातील नौकरी व समाजागृतीचे ध्येय स्व महेबुब पाशा शेख यांचा लढा आहे आणी यातुन मुस्लिम समाजला सामाजिक, आथिर्क, राजकीय ,शैक्षणिक,लढा दिला स्वताची काळजी घेतली नाहीं समाज मुख्यप्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला हा इतिहास आहे २४ जानेवारी २००५ साली अल्पकालावधीत दु:खद निधन झाले कमी कालावधी कार्य जास्त झाले आज त्यांच्या पाठीमागे आई,तीनभाऊ,बहिणी,पत्नी, एक मुलगी ,असा परिवार आहे पण आईने मुलगा,तर बहिण ,भावांनी भाऊ मुलीने वडील हे समाजासाठी म्हटले तर चुकीचे ठरणार नाहीं हे बलीदान आहे आणी त्या नंतर न्या.राजेंद्र सच्चर समीती पाशा पटेल यांनी चालवली त्यानंतर एम आय एम ने महाराष्ट्र राज्यात प्रवेश केला तो हि नांदेड़ येथुन तर औरंगाबाद येथे मुस्लिम विकास परिषदेने पायाभरणी केलेली आहे व एम आय एम मुख्यालयात प्रा.वहिदाभाभी व स्व : महेबुब पाशा शेख यांनी शेवटच्या क्षणी माजी खा.सुलतान सलावोद्दीन ओवैसी यांची भेट घेतली होती स्व: महेबुब पाशा शेख यांचे बलीदान होते त्या निम्मीताने नवयुवक नवतरूण यांना मुस्लिम विकास परिषद ची समाज जागृती आठवण म्हणुन मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या माध्यमातून २१ वर्षी पुर्वी लातुरातील भुमीपुत्र स्व: महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी मुस्लिम आरक्षणाची रणरागिणी प्रा.वहिदाभाभी पत्नीला मुस्लिम महिला घराबाहेर जाने शक्य नव्हते तेव्हा मुस्लिम शिष्यवृत्ती आरक्षणाची मागणी लोकशाही मार्गाने शासन दरबारी लढा दिला शिष्यवृत्ती लागु झाली आरक्षण हि ५% दिले पण देवेंद्र सरकारने अमंलबजावणी केले नाही व २७ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे खा. असदुद्दीन ओवैसी मुस्लिम समाजासाठी तिरंगा रँली काढत मुस्लिम आरक्षण हम होंगे कामयाब भुमिका घेतली स्व: महेबुब पाशा सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची आज पुण्यतिथी समाजात मुस्लिम आरक्षणाची जनजागृती होत आहे हिच खरी श्रंदाजली ठरेल... संकलन
मुस्लिम आरक्षण समर्थक
अब्दुल समद शेख 8329869010
9423719957
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.