नव मतदारांना आपल्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.


 

नव मतदारांना आपल्या कर्तव्याची जाणीव होण्यासाठी

राष्ट्रीय मतदार दिन साजरा

                                                           -जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी.





 







लातूर,दि.25 (जिमाका):- सार्वत्रिक निवडणूकीत जास्तीत जास्त नव मतदारांनी सहभाग नोंदवावा. देशात लोकशाही बळकट व्हावी तसेच आपल्या कर्तव्याची जाणीव करुन देण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करत असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ऑनलाईन कार्यक्रमात केले.

 जिल्हा निवडणूक अधिकारी व दयानंद कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्टीय मतदार दिना निमित्त दयानंद कला महाविद्यालय सभागृहात आयोजित ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड होते. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी सुनील यादव, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश महाडिक, तहसिलदार स्वपनील पवार, नायब तहसिलदार कुलदीप देशमुख सह उपप्राचार्य अनिल कुमार माळी उपस्थित होते.

या राष्ट्रीय मतदार दिना निमित्त ऑनलाईन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले की, सार्वत्रिक निवडणूकीत जास्तीत जास्त नव मतदारांनी आपले नांव मतदार यादीत नोंदवून लोकशाही बळकट करण्यासाठी  नव मतदारांनी आपला सहभाग नोंदवून राष्ट्रीय कर्तव्य केले पाहीजे. यासाठी प्रति वर्षी 25 जानेवारीस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून या कार्यक्रमाचे  सर्व ठिकाणी आयोजन करण्यात येते. या कार्यक्रात जिल्ह्यातील सर्व नागरीकांना लोकशाही बळकट करण्यासाठी  तसेच मतदारांमध्ये जनजागृहत व्हावी या उद्देशाने वेगवेगळया कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो या म्हणी प्रमाणे प्रत्येकाने या राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकरी  पृथ्वीराज बी.पी. यांनी यावेळी केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड म्हणाले की, जिल्ह्यात प्रत्येक महाविद्यालयात / शाळेत राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रम साजरा होत असून नव मतदारांना आपल्या अधिकाराची / कर्तव्याची जाणीव व्हावी याची  जनजागृती होत असल्याने येणाऱ्या निवडणूकीत नव मतदार आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावतील अशी आशा व्यक्त केली.

यावेळी या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ठ काम केल्या बद्दल नायब तहसीलदार कुलदीप देशमुख यांचा उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. तसेच वर्क्तत्व स्पर्धेत प्रथम आलेल्या कु. साक्षी सगर व व्दितीय आलेल्या कु. श्रध्दा गुरुव यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी उपविभागीय अधिकारी सुनील यादव यांनी या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन करुन उपस्थित मतदारांना शपथ दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य अनिलकुमार माळी यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ. दिलीप नागरगोजे यांनी केले. शेवटी आभार प्राध्यापक विवेक झंपले यांनी मानले.

,

                                                  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या