*परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांची अवैध धंद्यावर कारवाई. देशीदारू सह एकूण 2,12,340/- रुपयाचं मुद्देमाल हस्तगत.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री.अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक तयार करून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सदर पथक पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की,लातूर ते नांदेड जाणारे रोडवर एक ओमनी कंपनीच्या गाडी मधून दारूची अवैद्य वाहतूक होणार आहे. त्यावरून पथकाने एका हॉटेलसमोर सापळा लावला असता थोड्याच वेळात बातमीप्रमाणे एक ओमनी कार क्रमांक एम.एच. 01 ए. आर.7026 अशी येताना दिसली. त्यावर पथकाने सदरची गाडी थांबून पाहणी केली असता त्यामध्ये दहा बॉक्समध्ये वेगवेगळ्या लेबलची देशी दारू असल्याचे निदर्शनास आले. त्यावर बेकायदेशीररित्या विक्री व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दारूची चोरटी वाहतूक करणारा इसम नामे
1) लक्ष्मण ज्ञानोबा जाधव, वय 29, वर्ष राहणार चिकलठाणा तालुका जिल्हा लातूर त्याचे विरुद्ध पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 121/2022 कलम 65 (अ)(ई) मुंबई दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक चे पोलीस करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.