*महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समीती च्या राज्य नेते पदी माधवराव लातूरे सर यांची निवड ...*
औरंगाबाद : दि. २३ ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समीतीची त्रैमासिक महामंडळ सभा औरंगाबाद येथे २० फेब्रुवारी २०२२ रोजी संस्थापक दिलीपराव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य अध्यक्ष अंकुश काळे यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.
यावेळी उद्घाटक म्हणून विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे उपस्थित होते.
व्यासपीठावर के सी गाडेकर माजी राज्य नेते, माधवराव लातूरे माजी राज्य सरचिटणीस, गिरीश नाईकडे राज्य उपाध्यक्ष, रामदास सांगळे माजी कार्याध्यक्ष, सचिन हांगे राज्य संपर्क प्रमुख, अंजुम पठाण माजी राज्य सहचिटणीस, रामकिशन लटपटे राज्य कार्यालयीन चिटणीस, गजानन वाळके माध्यमिक राज्य प्रमुख, आर आर जोशी मराठवाडा प्रमुख, मुक्ता पवार महीला आघाडी प्रमुख, सुषमा राउतमारे महीला विभाग सरचिटणीस, यांच्यासह मान्यवर राज्य पदाधिकारी, विभागीय पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमास जिल्हा, तालूका, माध्यमिक विभाग, महीला विभागासह विविध कॅडरचे पदाधिकारी राज्य भरातुन उपस्थित होते.
या महामंडळाच्या सभेत स्थापनेपासून च्या मागील आदर्श कार्यावरून माधवराव लातूरे यांची बिनविरोध महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समीतीच्या राज्य नेते पदी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल कार्यक्रमाचे उद्घाटक हरिभाऊ बागडे नाना माजी अध्यक्ष विधानसभा महाराष्ट्र व मान्यवर, पदाधिकारी यांच्या हस्ते माधवराव लातूरे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेछा देण्यात आल्या. अशी माहिती आमच्या प्रतीनिधीशी बोलताना संघटनेच्या वतीने देण्यात आली.
महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समीतीची स्थापना राज्यातील सर्व कॅडर मधील शिक्षक बंधू भगीनी यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजी करून या संघटनेस राज्य व श्रमीक महासंघाची मान्यता घेण्यात आलेली आहे.
या संघटनेत स्थापनेपासून आज पर्यत राज्य सरचिटणीस या पदाची जबाबदारी घेवून अनेक मार्गांनी संघटना वाढवून शिक्षक बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र कार्य केलेले माधवराव लातूरे यांच्या कार्याचा आढावा घेवून लातूरे सर यांची पुढील तीन वर्षां वर्षा साठी राज्य नेते पदी निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.