*हरभरा खरेदी साठी ऑनलाईन नोंदणी करा :संतोष सोमवंशी*
केंद्र शासनाने निश्चित केलेल्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजने अंतर्गत लातूर जिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग अधिकारी यादव सुमठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली 16 फेब्रुवारी पासून हरभरा खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे . यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी . करावी असे आवाहन संस्थेचे सभापती ' संतोष सोमवंशी यांनी केले आहे .
यावर्षी शासनाने हरभऱ्यासाठी पाच हजार 230 रुपये हमीभाव जाहीर केला आहे . एफएक्यु प्रतीच्या हरभऱ्याला प्रति क्विंटल पाच हजार 230 रुपये दर देण्यात येणार आहे . खरेदी करण्यात आलेल्या हरभरा मालाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऑनलाईन जमा करण्यात येणार आहेत . शेतकऱ्यांनी NEMl पोर्टल वर ऑनलाईन नोंदणीसाठी आधार कार्ड , सातबारा ८ अ उतारा तलाठ्यांच्या स्वाक्षरीचा पीक पेरा उतारा किंवा हरभरा पिकाच्या नोंद असलेला सातबारा , आधार लिंक असलेले बँक पासबुक झेरॉक्स ही कागदपत्रे घेऊन औसा तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ औसा या कार्यालयात जमा करून नोंदणी करून घ्यावी , असे आवाहन संस्थेचे सभापती मा . संतोष सोमवंशी, उपसभापती शेखर चव्हाण, सचिव गणेश क्षिरसागर यांनी केले आहे .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.