औसा शहराला पाणी पुरवठा करणारा मोठा वॉल दुरुस्त करा
औसा प्रतिनिधी
औसा शहरातील खादी भांडार जवळील शहराला पाणीपुरवठा करणारा मोठा वॉल दुरुस्त करा या मागणीसाठी एम आय एम च्या वतीने औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे
औसा शहरातील पाणी पुरवठा करणा-या पाईप लाईन वरील खादी भांडार जवळील वाॅल ब-याच दिवसांपासून खराब झालेला असुन त्याशेजारी गावातील मोठा नाला आहे.व सदरील वॉल मधुन 25 ते 30 टक्के पाणी वाया जात आहे व घाण पाणी वॉल मध्ये जात आहे.ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.व शेजारी रस्ता सततच्या पाण्यामुळे खराब झाला आहे.याबाबत एम आय एमच्या वतीने नगर पालिकेत वेळोवेळी तोंडी सुचना देऊनही त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही.तरी याबाबत मुख्याधिकारी यांनी लवकरात लवकर योग्य ती उपाययोजना करुन लवकरात लवकर सदर पाणी बंद करण्यात यावे. या मागणीसाठी दिनांक 15 फेब्रुवारी 2022 मंगळवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनावर एमआयएमचे औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांची स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.