उर्दू ही सर्व भारतीयांची भाषा आहे याला जतन करण्याची आम्हां सर्वांची जबाबदारी - काजी अमजद अली यांचे प्रतिपादन

 

उर्दू ही सर्व भारतीयांची भाषा आहे

याला जतन करण्याची आम्हां सर्वांची

जबाबदारी - काजी अमजद अली

यांचे प्रतिपादन 






अ.भा उर्दू साहित्य समिती तर्फे  

वैशाली बोने यांना उर्दू मित्र तर 

डॉ.फरजानाखानम शेख,  रियाज वळसंगकर 

व म.रफीक शेख यांना जिवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रम थाटात संपन्न

▪️▪️▪️▪️



अ.भा.उर्दू साहित्य संमेलन समिती सोलापूर च्या वतीने दरवर्षी उर्दू दिनानिमित्त मराठी भाषिकातून उर्दू भाषा अवगत असणाऱ्या व उर्दू भाषेवर प्रेम करणाऱ्या एका मान्यवरांचा "उर्दू मित्र" म्हणून, वृशाली बोने तर उर्दू साहित्य व शैक्षणिक क्षेत्रात व उर्दूच्या विकासासाठी व साहित्य क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या  रफीक नवाज,  प्राचार्या फरजाना खानम शेख , प्रा  रियाज वळसंगकर ,यांना त्यांच्या योगदानासाठी गौरव पुरस्कार  कार्यक्रमाचे अध्यक्ष मुफ्ती काजी सय्यद अमजद अली यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुणे सहा . पोलीस आयुक्त अशिवीनी भोसले यांच्या प्रमुख उपस्थित देऊन सन्मानित   .करण्यात आले   

 अध्यस. अॅड . यु .एन. बेरिया यांनी पाहुण्याचा सत्कार केले बागबान यांनी कुरणपठण केले सहसचिव अशफाक सातखेड यांनी प्रास्ताविक करत " सिपासनामा " चे वाचन केले सुत्र संचलन स्फीक खान यांनी केले

प्रमुख पाहुणे अशविनी भोसले म्हणाल्या _ . उर्दू ही गोड मधूर, प्रभावी भाषा आहे मी . ही उर्दू भाषा अवगत केले ,  चांगली भाषा ही आपली ओळख करुन देते म्हणून प्रत्येक भाषा नीटपणे शिकली पाहिजे व बोलली पाहिजे 


उर्दू व मराठी भाषिकात संबंध दृढ होऊन त्यांच्यात प्रेम व स्नेहभाव निर्माण व्हावा या हेतूने हा कार्यक्रमाचे आयोजन  होते हे उर्दूच्या उन्नती व प्रगती साठी प्रेरणादायी ठरणार आहे

असे मत शहर काजी मुफ्ती अमजद अली यांनी अध्यक्षपदावरून व्यक्त केले

ते पुढे म्हणाले - उर्दू भाषा गंगा -जमनी , संस्कृती चे प्रतीक आहे . उर्दू भाषा हे दोन मनाना , दोन भाषिकांना जोडणारी आहे , म्हणून याचे जतन करणे जरुरीचे आहे कारण उर्दू ही फक्त मुस्लिमांची भाषा नसून ही सर्व भारतीयांची भाषा आहे जे उर्दू बोलतो उर्दू त्यांची असते . उर्दू ही भारतीयाची विरासत आहे याचे जतन करणे आम्हां सर्वांची जबाबदारी आहे



या वेळी कार्यकारी मंडळातील विकार शेख , शफी कॅप्टन , अय्यूब नल्लामंदू , नासर आळंदकर, रफीक खान, इक्बाल सय्यद , याकूब मंगलगीरी , जब्बार शेख , रफीक नल्लामंदू , बंदूक वाला सर, जनवाडकर मॅडम व सर्व स्तरातील व्यक्ती हजर होते

शेवटी हुसेन बक्षी यांनी आभार मानले 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या