*आभार*
*आज बोरफळजवळ एका दुचाकी वाहनाचा अपघात झाला. तेथे एक तरूण गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. लोक रुग्णवाहिका उपलब्ध होते का ? यासाठी फोन करत होते. मी त्या तरूणाची गंभीर परिस्थिती डोक्याची जखम आणि होणारा रक्तस्त्राव पाहून माझ्या गाडीत नेण्याची इच्छा व्यक्त केली. व लागलीच तेथे थांबलेल्या एका व्यक्तिचा गमजा जखमी तरूणाच्या डोक्याला बांधून माझ्या गाडीत मागच्या सीटवर झोपवले.फार मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता.*
*गाडी चालवत डॉ शेख आर आर मेडिकल ऑफिसर औसा यांना फोन करून एक गंभीर रुग्ण औसा येथे आणत असल्याचे सांगितले.त्यांनी तेथे उपस्थित डॉ ना सुचना केल्यामुळे मी जाईपर्यंत तेथे स्ट्रेचर घेऊन कर्मचारी तसेच छावा संघटनेचे नागेश मुंगळे हे उपस्थित होते.*
*औसा येथे प्राथमिक उपचारानंतर सह्याद्री हॉस्पिटल लातूर येथे रुग्णवाहिकेतून आणले. तरूणाची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आताच रुग्णालयात जाऊन नातेवाईकांची भेट घेतली असता शस्त्रक्रिया चालू असल्याचे समजले.*
*यासाठी मला सहकार्य करणारे डॉ शेख आर आर आणि औसा रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी, नागेश मुंगळे , श्रीमती श्रध्दा लोखंडे आणि इतरांचा मी मनापासून आभारी आहे.*
सलीम पठाण जिल्हाध्यक्ष अल्पसंख्याक अधिकारी व कर्मचारी संघटना लातूर.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.