यूक्रेनला जाण्याचे खा.रणजितसिंह निंबाळकरांचे विधान हास्यास्पद :उत्तरेश्वर कांबळे
सोलापूर: रशिया- युक्रेन मध्ये युध्द पेटले असुन माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह निंबाळकर म्हणतात की अडकलेल्या लोकांना आणण्यासाठी मला युक्रेनला जावूद्या असे .बालिशपणाचे हास्यास्पद विधान केले आहे.
वास्तविक पाहता खासदार निंबाळकर ज्या माढा लोकसभेचे प्रतितिधी आहेत. तिथे मतदारसंघात मुलभूत सुविधा नाहीत रस्ते ,वीज पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.
मतदारसंघातील करमाळा तालुक्यात अद्यापही 15 लाख मेट्रिक टन ऊस तोडणी अभावी शेतात तसाच उभा आहे.
शेतक-यांचे वीज कनेक्शन महावितरणकडून कट केली आहेत.
ऊस कारखानदार शेतक-यांकडून ऊस घेऊन जाण्यासाठी पैशाची लुट करत आहेत. तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट असुन विशेषत पोफळज -शेटफळ हा अवघ्या 2 किलोमीटर अंतराचा रस्ता दुर्लक्षित आहे. यासह अनेक मुलभूत सुविधांपासून तालुका वंचित असताना देखील
खासदार महोदय निवडून आल्यानंतर मतदारसंघात फिरकलेच नाहीत कोविड काळात देशवासियांना गाड्या सुध्दा दिल्या गेल्या नाहित त्यांना पायी जावे लागले अनेकांना जीव गमवावे लागले पण त्यांच्या युक्रेन जाण्याच्या हास्यास्पद विधानाने जनतेची करमणूक तेवढी झाली अशी बोचरी टीका भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे यांनी केली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.