शेयन इंटरनॅशनल स्कूल पिंपळणेर मध्ये छत्रपती शिवाजीराजे याना शिवकालीन वस्त्र परिधान करून चिमुकल्या विद्यार्थानी दिली मानवंदना
धुळे / साक्री
दिनांक १९ फेब्रुवारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन करत
रयतेचे राजे स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांची392 वी जयंती 19 फेब्रुवारी 2022 रोजी साजरी करण्यात आली
छत्रपती शिवाजी महाराज हे दूरदृष्टी असलेले महापुरुष होते.स्वराज्याची मुहूर्तमेंढ रोवताना त्यांनी स्थापत्यकलेसह मुलाचे शिक्षण महिलांचे संरक्षण ,युद्धकला गनिमीकावा यांसह विविध विषयावर त्यांचे प्राबल्य होते दूरदृष्टी होती. राजमाता जिजाऊनी त्यांना सर्व विषयात पारंगत केले होते. आज च्या घडीला देखील छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टी पानाचे दाखले देण्यात येतात
अठरा पगडी जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची पायाभरणी करणारे छत्रपती शिवाजी महाराज्य यांची जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली .या वेळी शाळेतील विद्यार्थांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळातील वस्त्र परिधान करून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मोडक्या तोडक्या आपापल्या आवाजात प्रकाश टाकला यावेळी
मधुरा कांबळे या विध्यार्थीनिने तिच्या आवाजात एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्यावर गीत सादर केलं या वेळी शाळेतील शिक्षक वृंद व विद्यार्थ्यांचे पालक ,गावातील प्रतिष्ठित, माननीय, सन्माननीय , आदी मान्यवरानी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली
व छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देऊन चिमुकल्यानी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त मानवंदना दिली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.