अफसर शेख युवा मंचच्या वतीने जावेद गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर

 अफसर शेख युवा मंचच्या वतीने जावेद गुरुजी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिर























औसा प्रतिनिधी

अफसर शेख युवा मंचच्या वतीने जावेद गुरुजी यांच्या 43 वा वाढदिवसानिमित्त आज औसा येथे प्रभाग क्रमांक तीन मधील कलावती सर्विसिंग सेंटर बाजूस कुमारस्वामी कॉलेज पाठीमागे येथे मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.यावेळी या शिबिरामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहनअफसर शेख युवा मंचचे संस्थापक व माजी नगराध्यक्ष जावेद शेख यांनी सांगितले.त्या अनुषंगाने या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिर, मधुमेह डायबिटीस विशेष मार्गदर्शन उपचार, डोळे तपासणी शिबिर, रक्त तपासणी, दातांची तपासणी उपचार या शिबिराचे आयोजन आज दिनांक 6 फेब्रुवारी  2022 रविवार रोजी सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी या शिबिराचे उद्घाटन लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर, डॉक्टर शेख एजाज सलीम, डॉक्टर शोहेब सुलतानी, डॉ वाडेकर लॅब, डॉक्टर पठाण जबीन मोहिद्दिन खान यांनी या शिबिरामध्ये भाग घेतला.या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.या शिबिरामध्ये 558 नागरिकांनी सहभाग नोंदविला.यावेळी या शिबिरामध्ये मुजाहेद शेख,मेहराज शेख उमरभाई पंजेशा, अफसर शेख युवा मंचचे अध्यक्ष अॅडव्होकेट वकील इनामदार, मुकेश तोवर नगरसेवीका किर्तीताई कांबळे, वैशाली नारायणकर, विनायक सुर्यवंशी, संगमेश्वर उटगे,एकलास काझी,समीर शेख,खदीर सर,बाबा पटेल,बाबा शेख आदि उपस्थित होते.या शिबिराला अपेक्स हाॅस्पीटल,शम्स स्माईल दातांचा दवाखाना,आई आॅप्टीकल्स,अपेक्स कीलीनीक्स लॅब,न्यु भारत मेडिकल यांनी विशेष सहाय्य केले.या शिबिराला यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अफसर शेख युवा मंचचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या