*सेलू केंद्राची शिक्षणपरिषद "बाला" उपक्रमाने संपन्न*
औसा
दि.१८ फेब्रूवारी २०२२ रोजी सेलू केंद्राची शिक्षणपरिषद जि.प.प्रा.शा.बुधोडा च्या नियोजनाखाली थोरमोठे लॉन्स ,लातूर येथे "बाला" (BALA) च्या विविध उपक्रमांनी शैक्षणिक वातावरणात संपन्न झाली.
आजच्या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा,जि.प.सदस्या सौ.दैवशाला कोलपाक मॅम आणि प्रमुख अतिथी जि.प.सदस्या सौ.सोनालीताई थोरमोठे,गुणवत्ता कक्षाच्या प्रमुख डॉ. भागीरथी गिरी मॅम,जेष्ठ अधिव्याख्याता श्री. सतीश भापकर सर,शिक्षण विस्तार अधिकारी श्री. राम कापसे साहेब,सेलू केंद्रप्रमुख श्री. सोमनाथ बोयने सर.... यांच्या हस्ते सावित्रीबाईच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुंदर सुरुवात झाली.
जि.प.प्रा.शा.बुधोडा च्या बालचमुने उत्कृष्ट स्वागतगीत व समूहगीत सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.
शिक्षण परिषदेतील प्रमुख आकर्षण ठरते ते श्रीमती जगदेवी खानापुरे मॅमनी सादर केलेल्या बाला उपक्रमातील दरवाजातील कोनमापक आणि श्री. प्रभाकर हिप्परगे सरांनी विदयार्थांसह सादरीकरण केलेली लपंडाव भिंत ! तसेच श्री. राजेश क्षीरसागर सरांचे इंग्रजी अध्यापन कौशल्य !! यावर आपल्या सुंदर प्रतिक्रिया गिरी मॅम,कुलकर्णी सर,खरोसे सर,जाधव सर यांनी दिल्या.
या भव्यदिव्य कार्यक्रमास सेलू केंद्रातील सर्व शाळांचे सर्व शिक्षकवृंद ,संबंधीत सर्व अधिकारीवर्ग आणि निवडक विदयार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक श्री. युवराज घंटे सर आणि श्री. नरेश थोरमोठे सर यांनी केले.तर या सुंदरशा कार्यक्रमाचे सुंदरसे सुत्रसंचालन श्री. प्रभाकर हिप्परगे सरांनी केले.शेवटी श्रीमती भारत कांबळे मॅमनी आभार मानून कार्यक्रमाची सुंदर सांगता केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षकांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.