निलंग्यात शिवरायांच्या विश्वविक्रमी तैलचित्राचे अनावरण
निलंगा येथे आज
रक्तदानाचा महायज्ञ
निलंगा येथे आज
रक्तदानाचा महायज्ञ
निलंगा/प्रतिनिधी:अक्का फाऊंडेशनच्या पुढाकारातून निलंगा येथे साकारण्यात आलेल्या विश्वविक्रमी ११ हजार चौरस फुटाच्या छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेच्या तैलचित्राचे लोकार्पण माजी खासदार श्रीमती रूपाताई पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संपन्न झाले.
अक्का फाउंडेशनच्या वतीने शिवजयंतीनिमित्त निलंगा येथे दरवर्षी नव्या संकल्पना राबविण्यात येतात. भाजपाचे प्रदेश सचिव युवानेते अरविंद पाटील नि
लंगेकर यांच्या पुढाकारातून मागील पाच वर्षात शिवरायांची विश्वविक्रमी रांगोळी, शिवरायांची हरित प्रतिमा, बारा बलुतेदारांच्या हस्ते शिवरायांना अभिषेक, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी यासारखे उपक्रम राबविण्यात आले असून या वर्षी ११ हजार चौरस फूट आकाराचे शिवरायांचे विश्वविक्रमी तैलचित्र साकारण्यात आले आहे. या तैलचित्राच्या निर्मितीसाठी मागील १५ दिवसांपासून मंगेश निपाणीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मेहनत घेतली. यासाठी ४५० लिटर ऑइलपेंट वापरण्यात आले आहे.
माजी खासदार रूपाताई पाटील यांच्या शुभ हस्ते शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी दीपप्रज्वलन करून तैलचित्राचे अनावरण संपन्न झाले. या कार्यक्रमास राज्याचे माजीमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपाचे प्रदेश सचिव युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष भारत बाई साळुंके सभापती गोविंद चिंलकूरे निलंगा पंचायत समितीच्या सभापती राधाताई बिराजदार निलंगा नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे उपनगराध्यक्ष मनोज कोळे भाजपाचे तालुकाध्यक्ष शाहूराज शेटे शहराध्यक्ष वीरभद्र स्वामी शिवजयंती महोत्सव समितीचे डॉ लालासाहेब देशमुख शेषराव ममाळे दत्ता शाहीर एस एस शिंदे किरण बाहेती सय्यद इरफान पाशामियाँ आतार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .
राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता शिवजयंतीनिमित्त रक्तदानाचा महायज्ञ शनिवार रोजी आयोजित करण्यात आला आहे.यासाठी एक घर एक रक्तदाता संकल्पना राबविण्यात येत आहे.मागील ५ वर्षांपासून शिवजयंती निमित्त निलंगा येथे राज्याला दिशा देणारे उपक्रम राबवले जात आहेत.हे उपक्रम प्रेरणादायी आहेत.यापासून हजारो युवकांना प्रेरणा मिळत राहील,असे माजीमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना म्हटले.
शिवजयंतीनिमित्त रविवारी रक्तदानाचा महायज्ञ आयोजित करण्यात आला असून निलंगा शहरासह तालुक्यातील युवकांनी रक्तदान महायज्ञात सहभागी व्हावे,असे आवाहन भाजपाचे प्रदेश सचिव अरविंद पाटील पाटील निलंगेकर यांनी यावेळी बोलताना केले.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.