*जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे शिवजयंती उत्साहात साजरी*
आज दि.१९ फेब्रूवारी २०२२ जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे *इतिहासाच्या पानावर,रयतेच्या मनावर,महाराष्ट्र मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा जाणता राजा श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती* कोविड:१९ चे नियम पाळून साधेपणाने पण मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
आजच्या या शिवजन्म सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. युवराज घंटे सर,श्री. प्रभाकर हिप्परगे सर यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व श्रीफळ फोडून विनम्र अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी घंटे सरांनी प्रास्ताविक आणि आपले मनोगत नेहमीच्या आपल्या सहज सुंदर ओघवत्या भाषाशैलीत कथन केले.कु. हर्शदा,साक्षी,मयुरी,आरती,वैभव... यांची भाषणे झाली.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.
ज्ञानेश्वर गायकवाड सरांनी उपस्थित सर्व मुलामुलींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सर आपल्या भाषणात म्हणाले, "अशक्य आणि अवघड आहे म्हणून थांबलो तर निश्चित ध्येयापर्यंत आपण पोहचू शकणार नाही. तेंव्हा समोर संकटे दिसली ना, त्या संकटाच्या डोक्यावर पाय देवून उभं राहायचं आणि फक्त झुंजायचं आणि विजय मिळेपर्यंत माघार घ्यायची नाही. हा धडा शिवरायांच्या इतिहासातुन आपण घेतला पाहिजे. आणि ध्येय साध्य केले पाहिजे." हा मोलाचा संदेश देत देत मुलांशी मुक्त संवादही त्यांनी साधला.
नेहमी प्रमाणेच कार्यक्रमाचे सुंदर सुत्रसंचालन आणि आभार दोन्ही बाबी श्री.प्रभाकर हिप्परगे सरांनी अत्यंत उत्तमरित्या पार पाडल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी मदत केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.