पोलीस चार्ली पेट्रोलिंगच्या पोलीस अमलदारांची दैदिप्यमान कामगिरी..तलवार घेऊन जाणाऱ्या युवकाला चार्ली पेट्रोलिंग पोलिसाकडून अटक. गुन्हा दाखल दोन तलवारी जप्त*

    *पोलीस चार्ली पेट्रोलिंगच्या पोलीस अमलदारांची दैदिप्यमान कामगिरी..तलवार घेऊन जाणाऱ्या युवकाला चार्ली पेट्रोलिंग पोलिसाकडून अटक. गुन्हा दाखल दोन तलवारी जप्त*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

              या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून उदगीर शहरात चार्ली पोलीस पेट्रोलिंग कार्यान्वित करण्यात आली होती.चार्ली क्रमांक 11 पोलीस अंमलदार मोटरसायकल वरून शहरात पेट्रोलिंग करीत असताना उदगीर शहरातील चौबारा परिसरात एक तरुण  तलवारी घेऊन जात असताना आढळून आला.

           त्यावरून सदर चार्ली पेट्रोलिंग च्या पोलीस अंमलदारांनी युवकास ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लोखंडी तलवारी काढून घेतले व त्यास त्याचे नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव

1) बालाजी राजू गिरीजनोर, वय 26 वर्ष, राहणार सोमनाथपुर, तालुका उदगीर मूळ राहणार कारकपल्ली जिल्हा बिदर राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगितले.

               त्याचे विरोधात पोलीस ठाणे उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2022 कलम.4,25, शस्त्र अधिनियम कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून बालाजी राजू गिरीजनोर यास अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार गोलंदाज हे करीत आहेत.

             सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस पेट्रोलिंग मोटारसायकल चार्ली क्रमांक 11 चे पोलीस अमलदार रमेश मंडलापुरे, निखिल बुकटे यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या