हासेगाव फार्मसीत चार दिवसीय कार्यशाळा

 हासेगाव फार्मसीत चार दिवसीय कार्यशाळा   



           श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थे अंतर्गत लातूर कॉलेज ऑफ फार्मसी हासेगाव महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास आणि प्लेसमेंट प्रशिक्षण या चार दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.               या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून  लातूर येथील  ढगे  क्लासेस चे संचालक श्री सचिदानंद ढगे,  श्री वेताळेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे संस्थेचे कोषाध्यक्ष श्री  शिवलिंग जेवळे, श्री प्रशांत दराडे ,श्री पद्माकर कुलकर्णी ,श्री मेहता कन्हेया प्राचार्या डॉ श्यामलीला बावगे(जेवळे) इत्यादी  मंचावर उपस्थित होते.  या कार्यक्रमाची सुरवात सरस्वती मातेच्या मूर्तीचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा संपन्न झाला .          या प्रसंगी प्रास्तविक पर भाषण संस्थेचे सचिव श्री वेताळेश्वर बावगे यांनी  विद्यार्थ्याचा  व्यक्तीमत्व विकास आणि स्टेज करेज असणं खूप गरजेचे आहे असे थोडक्या शब्तात मोलाचे मार्गदर्शन केले .  त्याचबरोबर लातूर येथील  ढगे  क्लासेस चे संचालक श्री सचिदानंद ढगे यांनी  विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास आणि संवाद कौशल्य  या विषयावरती सविस्तर माहिती दिली .  त्याचबरोबर विधार्थ्यानी मुलाखत कशी दिली पाहिजे लुलाखतीची तयारी कशी केली पाहिजे आपली बॉडीलँग्वेज , आत्मविशास ,चेहऱ्यावर हसू तसेच डोळ्यात डोळे टाकून बोलावे ,संवाद स्पष्ट पणे साधावा , योग्य भाषा निवड अशा अनेक मुद्यावरती  मौल्यवान मार्गदर्शन केले.         या प्रसंगी या कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. संग्राम देशमुख सह समन्वयक प्रा. वाकडे एस एल. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विध्यार्थी  उपस्थित होते .  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वाकडे एस एल. केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोळसुरे जयश्री यांनी केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या