निरोगी व निकोप मन ,शरीर स्वास्थ्यसाठी खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक - राज्यमंत्री संजय बनसोडे

 


निरोगी व निकोप मन ,शरीर  स्वास्थ्यसाठी

खेळाच्या अशा स्पर्धा आवश्यक

                                                - राज्यमंत्री संजय बनसोडे




लातूर दि.27 ( जिमाका ):-आधुनिक जीवन शौली मुळे जीवनात ताणतणाव वाढले आहेत शरीर व मन निकोप व निरोगी राहण्यासाठी अशा खेळांची आवश्यकता असते यातून जगण्याचा नवा दृष्टिकोन मिळत असतो  असे मत राज्याचे पर्यावरण पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लातूर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील डॉक्टर साठी विविध खेळाच्या  स्पर्धाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

आधुनिक जीवन शैलीमुळे शारिरीक व मानसिक आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. मागील दोन वर्षापासुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला. कोरोना काळात डॉक्टर व वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण होता. यामुळे अशा खेळाच्या स्पर्धा मानसिक तणाव कमी करण्यास मदत करित असतात

इंडियन मेडिकल कॉन्सिल, लातूर शाखेच्या वतीने लातूर येथील ऑफिसर क्लब येथे डॉक्टर साठी विविध खेळांच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. . यावेळी इंडियन मेडिकल कॉन्सिलचे लातूर शाखेचे अध्यक्ष डॉ.सुरेखा काळे, सचिव, डॉ हनुमंत किनीकर, डॉ.मोहिनी गणू, डॉ.राजेश्वरी सावंत, डॉ. सुनील होळीकर, डॉ. जैतिन जैस्वाल इत्यादी उपस्थित होते.

दोन वर्षापासून जागतिक महामारीचा सामना जग करीत आहे. या काळात डॉक्टर व आरोग्य यंत्रणेने दिवसरात्र अतिशय उत्कृष्ट असे कार्य केले आहे. जीवाची पर्वा न करता या मंडळीनी सेवा  केली आहे. डॉक्टर हा समाजातील अतिशय महत्त्वाचा घटक असून यांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहावे यासाठी अशा स्पर्धा आवश्यक आहेत. या काळातील आधुनिक जीवनशैली मुळे अनेक ताणतणावांना या मंडळींना सामोरे जावे लागते. इंडियन मेडिकल कॉन्सिलचे हे अत्यंत उत्कृष्ठ उपक्रम आहे. निकोप व निरोगी समाजव्यवस्थेसाठी अशा स्पर्धेची आवश्यकता असते असे मत राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.


 

0000

वृत्त क्र. 130                                                                                           दिनांक:-27 फेब्रुवारी, 2022

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवा,डोस पासून एकही पालक वंचित राहू नये याची दक्षता घ्या

                                       - राजमंत्री संजय बनसोडे

लातूर दि.27 ( जिमाका ):- राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबवून एकही बालक पोलिओ डोस पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन संजय बनसोडे यांनी केले.

लातूर येथील स्त्री रुग्णालयात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेप्रसंगी ते बोलत होते. देश पोलिओ मुक्त होत आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून जनजागृती करावी. बालकांना पल्स पोलिओ लस दिली जाते,  त्याचप्रमाणे नागरिकांनी  कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचा पहिला व दुसरा आणि बूस्टर डोस घ्यावा. व कोविड-19 पासून बचाव होणार आहे. तसेच येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा द्यावी.

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेतर्गत 0 ते 5 वर्षे वयोगटातील शंभर टक्के पोलिओ लसीद्वारे संरक्षित करणे हा मुख्य उद्देश आहे, असेही राजमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महानगरपालिकेचे मनपा आयुक्त अमन मित्तल, उपायुक्त श्रीमती सिंदिकर,आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, निवासी वैधकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक बडे,  बालरोगतज्ज्ञ डॉ.धुमाळ, डॉ. भागडीया, डॉ. लापसे तसेच स्त्री रुग्णालयातील अधिसेविका, परिचारिका आदिंची यावेळी उपस्थिती होती.

                                                                                    0000

वृत्त क्र. 130                                                                                                        दिनांक:-27 फेब्रुवारी, 2022

 “मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न

 

माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी

मातृभाषा महत्वाची, मातृभाषेची जोपासना आणि वृध्दी करुया

                                             -  प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे  

§  संत ज्ञानोबा, तुकडोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा मराठी भाषेला लाभला

§  आपल्या भावना, कल्पना आणि विचार व्यक्त करण्याचे मातृभाषा हे प्रभावी साधन

§  जे ज्ञान मातृभाषेतून प्राप्त होते, त्या ज्ञानाला संस्कृतिचा सुगंध असतो

लातूर दि.27 ( जिमाका ):-  माणसाचे जीवन समृध्द करण्यासाठी मातृभाषा ही खुप महत्वाची गोष्ट आहे. जगभरातल्या भाषा शिका पण अभिव्यक्त होण्यासाठी मातृ भाषेऐवढी सशक्त भाषा कोणतीच नाही. माणसाला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्कानी मिळतात, त्याची जोपासना आणि वृध्दी करणे आपले कर्तव्य आहे, अशी भावना प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मराठी भाषा गौरव दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.

जिल्हा माहिती कार्यालय, लातूर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते दूरदृष्य प्रणालीव्दारे बोलत होते.  

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी, उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.,लातूर जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जवळगेकर, प्रा. डॉ. सुनिता सांगोले, प्रा. डॉ. अंकुशकुमार चव्हाण, प्रा. डॉ. सुभाष कदम, उपप्राचार्य अनिलकुमार माळी , पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे आदि विविध प्रमुख मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

पुढे डॉ. पाटणे म्हणाले आपले मन सांस्कृतिक संबंधांनी बांधलेले असते. सुसंस्कृत मानव्य निमार्ण करण्याचे कार्य मराठी साहित्याने केले आहे. ज्ञानोबा, तुकडोबांच्या संत साहित्याचा मौल्यवान वारसा मराठी भाषेला लाभला आहे. आज आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरुन मराठी भाषा विश्वाशी नाते जोडत आहे, माणसांला मातृभाषा आणि संस्कृती या दोन गोष्टी वारसा हक्काने येतात. या भाषिक आणि सांस्कृतिक सामर्थ्यावर तो प्रगती करतो. आपल्या भावना, कल्पना आणि विचार व्यक्त करण्याचे मातृभाषा हे प्रभावी साधन आहे. भाषा आणि शिक्षणाचा संबंध जिव्हाळ्याचा असतो. जे ज्ञान मातृभाषेतून प्राप्त होते. त्या ज्ञानाला संस्कृतिचा सुगंध असतो, असे गौरवोदगार डॉ. पाटणे यांनी यावेळी काढले.

भाषा ही मानवी जीवनात अत्यंत महत्वाची असून भाषा अस्मिताही माणसांची भावनिक गरज असते. भाषा ही फक्त संवादाचे माध्यम नसते, तर माणसाची अस्मिता असते. त्यामुळे भाषा वाढली पाहिजे, अधिक समृध्द झाली पाहिजे. त्यामुळे 27 फेब्रुवारी हा दिवस कुसमुमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा गौरव दिन  म्हणून साजरा करतो. आज मराठी भाषा गौरव दिनी हा कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केला असल्याचे सांगून जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी या दिनाचे महत्व विषद केले.

विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपूर्ण करुन अभिवादन करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले, अध्यक्षीय समारोप शिक्षण संस्थेचे सचिव रमेश बियाणी यांनी केले. तर  सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष कदम यांनी केले, आभार स्नेहा वाघमारे यांनी मानले. 

****

--


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या