*मध्यरात्रीच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान तीन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात. चार गुन्ह्यांची कबुली पोलीस ठाणे,निलंगाची कामगिरी*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता संपूर्ण लातूर जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. त्यावरून अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे नेतृत्वात पोलीस ठाणे स्तरावर पथक तयार करून दिनांक 25/02/2022 ते 26/02/2022 च्या मध्यरात्री अचानकपणे कोम्बिंग ऑपरेशन चे आयोजन करण्यात आले होते.
सदरच्या कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस ठाणे निलंगा चे पोलीस निरीक्षक बी.आर. शेजाळ हे त्यांचे पथकासह निलंगा हद्दीत नाकाबंदी करून सराईत गुन्हेगार चेक करीत असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास उदगीर मोड निलंगा येथे पोलिस जीप पाहून एक मोटर सायकलवर असलेली तीन मुले त्यांची मोटरसायकल औराद शहाजानी कडे जाणारे रोडणे जोरात पळू लागले. त्यांचा संशय आल्याने पोलीस जिप ने अंदाजे दोन किलोमीटर पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडील मोटरसायकल क्रमांक एम. एच. 12 एफ 424 ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशन येथे घेऊन गेले त्यानंतर सदरच्या संशयित मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव
1) शंकर राजकुमार खोत, वय 21 वर्ष, धंदा मजुरी, राहणार- उजेड तालुका शिरूर अनंतपाळ
2) श्लोक बालाजी पबे, वय 20 वर्ष, राहणार उजेड तालुका शिरूर आनंतपाळ.
3) एक विधि संघर्ष बालक
असे असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले त्यात
1)पोलीस ठाणे निलंगा गुन्हा रजिस्टर क्रमांक 69/2022 कलम 461 34 भादवी.
2)पोलीस ठाणे शिरुर आनंतपाळ गुन्हा रजिस्टर क्रमांक 8/2022 कलम 379 भादवी.
3)पोलीस ठाणे शिरुर आनंतपाळ गुन्हा रजिस्टर क्रमांक 256/2021 कलम 379 भादवी.
4) पोलिस ठाणे देवणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 41/2021 कलम 379 भादवी.
याप्रमाणे 02 पान मटेरियल चे दुकाने व 02 मंदिरातील दानपेटी चोरीचे गुन्हे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान मिळालेल्या सराईत चोरट्यांकडून उघडकीस आलेले आहेत.
नमूद आरोपींना पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे निलंगा चे पोलीस अमलदार शिंदे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी (निलंगा) श्री डॉ. दिनेश कोल्हे यांचे नेतृत्वात पोलीस स्टेशन निलंगा चे पोलीस निरीक्षक श्री. शेजाळ पोलीस उपनिरीक्षक गोविंद राठोड, सफौ बब्रुवान भताने, पोलीस अमलदार बेग,सुधीर शिंदे, सोमवंशी, बळीराम मस्के, काळे, मजगे, मुळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.