*तपसे चिंचोली येथे जिल्हा परिषद* *शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन* *मोठया उत्साहात साजरा*
प्रतिनिधी: औसा
औसा : तालुक्यातील तपसे चिंचोली येथे 28फेब्रुवारी 2022 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष व सर्व शिक्षकांच्याहस्ते सि. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात विध्यार्थ्यानी विविध वैज्ञानिकांच्या जीवनावर भाषणे केली ,विज्ञावरील गीते सादर केली.तसेच विध्यार्थ्यांने विविध प्रयोग सादरीकरण केले त्यात पाण्याची घनता, जलशुद्धीकरण, पारदर्शक वस्तू अपारदर्शक वस्तू, ज्वलनासाठी ऑक्सिजनची अवशक्यता असते असे विविध प्रयोग विधर्थ्यानी सादर केले.वैज्ञानिक उपकरणांचे सादरीकरण विध्यार्थ्यानी रांगोळीच्या माध्यमातून रेखाटली .यावेळीं
कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून शाळेचे मुखध्यापक मोरे सर हे होते.तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. कोंडमगिरे सर यांनी केले .आभार प्रदर्शन श्री. आयरेकर सर यांनी मानले.या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी श्रीमती संतोषीमाता लोहार, श्रीमती अनुराधा कनामे. व विलास चव्हाण. सर यांनी सहकार्य केले.या वेळी अनेक विध्यार्थी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.