भिम आर्मी ची ताडमुगळी गावाला भेट*

 *भिम आर्मी ची ताडमुगळी गावाला भेट*





*भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या सुचनेवरून जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे व सहका-यानी दिली ताडमुगळी गावाला भेट*


   लातूर प्रतिनिधी  ;लक्ष्मण कांबळे


लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका येथिल ताडमुगळी या गावांमध्ये बौद्ध बांधवांवर बहिष्कार टाकल्याचे सोशल मिडिया च्या माध्यमातून सर्वञ बातमी पसरली दि 06 फेब्रुवारी2022 या रोजी भिम आर्मी चे महाराष्ट्र प्रदेश संघटक अक्षय धावारे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांच्या सुचनेवरून जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे जिल्हा संघटक बबलू गवळे सोशल मिडिया प्रमुख कार्तिक गायकवाड औसा तालूका अध्यक्ष समाधान कांबळे चळवळीतील सहकारी अशोक कांबळे व अन्य पदाधिकारी यांनी ताडमुगळी गावाला भेट दिली निलंगा प्रशासकीय अधिकारी यांनी मध्यस्थी करून सध्या प्रकरण मिटवले असले तरी त्या ठिकाणी असणाऱ्या दलित बांधवांच्या जिवाला धोका असल्याचे दिसून येत आहे. निलंगा तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी निवेदनाद्वारे गृहमंत्री यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे .दिवसेंदिवस ग्रामीण भागात बौद्ध समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण अधिक वाढत असल्याने त्यांना संरक्षणाची गरज आहे असे मत जिल्हा अध्यक्ष विलास चक्रे प्रसार माध्यमशी बोलत असताना आपले मत व्यक्त केले. जातीयवादी गावगुंडाना वेळीच आवर घातला पाहिजे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे गावांमध्ये असणा-या दलित समाजामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून न्याय मिळवून द्यायला पाहिजे असे मत यावेळी व्यक्त केले ताडमुगळी गावात सलोखा कायम राहावा. गावातील सर्वानी भाऊबंद म्हणून एकञीतपणे राहावे अशी भिम आर्मी ची अपेक्षा आहे परंतू आज प्रशासनाने मध्यस्थी होऊन प्रकरण मिटवले असले तरी .उद्या चालून गावगुंडांनी जर दलित बांधवांना टार्गेट केले तर याचा जिम्मेदार कोण असा ही प्रश्न यावेळी   भीम आर्मीने उपस्थित केला. भिम आर्मी पुर्णपणे ताडमुगळी गावातील बौद्ध बांधवांसोबत आहे वेळ पडली तर भीम आर्मीच्या स्टाईल ने आंदोलन करण्यात  येईल असा इशारा यावेळी देण्यात आला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या