सराईत चोरट्या सह दोघांना अटक. लातूर जिल्ह्यातील 03 घरफोड्यांचा उलगडा. 2 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.. स्थानिक गुन्हे शाखा ची कारवाई.

 लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो



           *सराईत चोरट्या सह दोघांना अटक. लातूर जिल्ह्यातील 03 घरफोड्यांचा उलगडा. 2 लाख 53 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत.. स्थानिक गुन्हे शाखा ची कारवाई...*

         


              या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यात घडलेल्या घरफोडी व चोरी चे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता निर्देशित केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विविध पथके तयार करून त्यांना मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या होत्या.

             

           त्याप्रमाणे विविध पोलिस स्टेशनला घडलेल्या व उघडकीस न आलेल्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दिनांक 19/03/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला  गोपनीय व विश्वासनीय माहिती मिळाली की, पोलीस अभिलेखावरील व दिवसा घरफोडी करण्याच्या सवयीचा आरोपी नामे सुदर्शन चंद्रपाटले हा चाकूर येथील सराफ लाईन मध्ये चोरीचे सोने विकण्याचा प्रयत्न करीत आहे. अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ चाकूर येथे रवाना झाले व चाकूर बाजारपेठेतून सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले, वय 28 वर्ष, राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकुर यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळील सोन्याच्या दागिने बाबत विचारपूस केली असता त्याने सदरचे सोने त्याचा आणखीन एक साथीदार नामे उमाकांत काशिनाथ भेटे, राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकुर यांच्यासह पोलीस ठाणे एमआयडीसी, रेनापुर व उदगीर शहर हद्दीतील त्यांनी केलेल्या चोरीच्या गुन्ह्यातील चोरलेला मुद्देमाल असल्याचे सांगितले.



          त्यावरून नमूद आरोपी नामे

1) सुदर्शन विष्णुकांत चंद्रपाटले, वय 28 वर्ष, राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकुर.

2) उमाकांत काशिनाथ भेटे, राहणार वडवळ नागनाथ तालुका चाकुर.

                  या दोघांना पोलीस ठाणे एमआयडीसी गुन्हा रजिस्टर क्रमांक 694/2021 कलम 354, 380 भादवि मध्ये अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यात चोरलेला सोन्यावर सोन्या-चांदीचा मुद्देमाल एकूण 2 लाख 53 हजार रुपयाचा जप्त करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांचे मार्गदर्शन आत पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस अधिकारी व अमलदार हे करीत आहेत.

            

         सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापटे, संपत फड, राजेश कंचे, राजू मस्के, जमीर शेख, केंद्रे ,प्रदीप चोपणे यांनी केली.







 *


 *

✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️✒️

*लातूर , उस्मानाबाद ,सांगली,सातारा,व कोल्हापूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी_लातूर रिपोर्टर व महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज_ साठी प्रतिनिधी नेमणे आहेत* , 
*ग्रामपंचायत , नगरपालिका , तालुकाच्या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत* 
*इच्छुकांनी संपर्क साधावा* - *मज़हरोद्दीन पटेल संपादक* *9975640170*
*समीर तांबोळी पश्चिम महाराष्ट्र प्रमुख* 
*9766161605*
या नंबर वर व्हाट्सप्प एस एम एस करावे
www.laturreporter.in
www.maharashtrareporter.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या