वेश्या व्यवसायावर छापा. ऑंटी सह 7 जणावर गुन्हा दाखल.03 पीडित महिलांची सुटका. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई

  *वेश्या व्यवसायावर छापा. ऑंटी सह 7 जणावर गुन्हा दाखल.03 पीडित महिलांची सुटका. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची कारवाई.*





          लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो

 या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. हद्दीतील एका परिसरात एक महिला तिच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील महिला व मुलींना बोलावून घेऊन घरामध्ये वेश्याव्यवसाय चालविते अशी खात्रीशीर बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून दिनांक 05/03/2022 रोजी संध्याकाळी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलिस अधीक्षक श्री. अभयसिंह देशमुख यांनी पोलीस निरीक्षक  सुधाकर बावकर,पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले व अनैतिक मानवी व्यापार वाहतूक प्रतिबंध कक्षाचे  पोलीस अधिकारी पोलीस अमलदार यांचे पथक तयार करून सदर ठिकाणी छापा मारला.त्या ठिकाणी  परराज्यातील मुली व महिलांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना बोलावून व्यवसाय व्यवसाय करणाऱ्या दोन ऑंटी तसेच एक एजंट व चार ग्राहकाच्या विरोधात पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 111/2022 कलम 3,4,5,7 अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 व कलम 370 भारतीय दंड विधान प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील तीन पीडित महिलां ची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे.

             गुन्ह्यातील नमूद आरोपीताना एक दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मिळाली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर हे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या