वंचित चे महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर यांच्या हस्ते लखनगाव येथे महिला शाखेचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी विलास तपासे
औसा तालुक्यातील लखनगाव येथे वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्ष मंजुषा ताई निंबाळकर यांच्या हस्ते शाखेचे उद्घाटन महिला बैठक घेऊन संवाद महिलेला विविध शासनाच्या योजनेची माहिती देऊन संघटना वाढविण्यासाठी महिलेला एकत्र करून जनजागृती करून महिला संघटनेची तालुक्यामध्ये मोठी मूठ बांधण्याचा निर्धार जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर यांनी घेतला आहे. बहुजन समाजातील सर्व महिलेला एकत्र करून सर्व जाती जमातीतील महिलेला एकत्र करून महिलेच्या न्याय हक्कासाठी जिल्ह्यामध्ये एक मोठी चळवळ उभा करणार आहेत..
दी.21/03/2022 रोजी मौजे लखनगाव ता.औसा येथे वंचित बहुजन आघाडी महिला शाखेचे, वंचित बहुजन आघाडी लातूर महिला जिल्हाध्यक्ष मा. मंजुताई निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करून बोर्डाचे अनावरन करण्यात आले.
या वेळी जिल्हा वंचित बहुजन आघाडी महिला उपाध्यक्षा .सुमित्रताई स्वामी, औसा तालुका आध्यक्ष शिवरूद्र बेरुळे (आप्पा),औसा तालुका महासचिव श्रावण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मन्यवरानी सर्वाना आपल्या विचारातून मार्गदर्शन केले.
विशेष म्हणजे शाखेच्या आध्यक्षपदी वडार समाजातील सौ.निर्मला बंडगर या भगिनिची निवड करण्यात आली.
या वेळी औसा तालुका वंचित बहुजन आघाडी च्या.छायाताई खरात यानी विशेस परिश्रम घेतले.तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी लखनगाव येथील वैभव सोनकांबळे,विशाल खरात व औसा तालुका वंचित बहुजन युवा आघाडीचे ओम खरात यानी सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी केला.
कार्यक्रमासाठी लखनगावातील आनेक महिला, पूरुष व उट्टी येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.सदर कर्य्क्रमावेळी जिल्हाध्यक्ष मंजु ताई निंबाळकर यानी मार्गदर्शन करताना सांगीतले की,लातूर जिल्हाआध्यक्ष या नात्याने सांगते की,महिला संघटन वाढवून जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता आननारच व जिल्हयात वंचित बहुजन आघाडीचा झेंडा लावणारच.
तशेच औसा तालुका महासचिव श्रावण कांबळे यानी इथ आसना-या एससी., एसटी,ओबिसीची सध्याची राजकीय परिस्थिती यावर विचार व्यक्त करून सत्तेचे दार हे ग्रामपंचायतच आहे व वंचित बहुजन आघाडी च्या प्रत्येक कर्यकर्त्यानी आपापल्या गावातील ग्रामपंचायत मधे जाण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन केले.
औसा तालुका आध्यक्ष श्री शिवारुद्र बेरुळे (आप्पा) यानी तालुक्यातील प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडी ची शाखा ओपन करून येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जिल्ह्यात व औसा तालुक्यात प्रवेश करणारच आसे बोलुण सर्व जमलेल्या लोकांचे व कार्यकर्त्याचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.