जिल्हा परिषद शाळेच्या दर्जेदार शिक्षणामुळे माझ्या जीवनात शिक्षणाची क्रांती स्वाती पवार.
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे जिल्हा परिषद शाळेमधे एमबीबीएस मध्ये प्रवेश झाल्यामुळे स्वाती प्रमोद पवार या विद्यार्थिनीचा जिल्हा परिषद शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी स्वाती पवार बोलताना म्हणाल्या की, माझ शिक्षण 1 ली 9 वि जिल्हा परिषद बेलकुंड शाळेमधे झाले. पायाभूत शिक्षणाचा दर्जा चांगला असल्यामुळे मला अपयशाची भीती कुठेही जाणवली नाही. बेलकुंड च्या शाळेच्या शिक्षकांनी मला शिक्षणात चांगल्या प्रकारचे शिक्षण दिल्यामुळे माझ्या आई वडिलांनी चांगले संस्कार दिल्यामुळे माझ्या जीवनामध्ये शिक्षणाची क्रांती झाली व मी या एमबीबीएस मध्ये प्रवेश करू शकले मी भविष्यात माझ्या गुरू आणि आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली चालून गोरगरिबांची सेवा करणार आहे. ह्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले, बेलकुंड चे सरपंच विष्णु कोळी, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तपासे, सदस्य गोविंद वगरे, महमंद पठाण, गोविंद वाघमारे, अनंत शिंदे, राजाभाऊ साळुंके, अशोक जाधव, व्हा.चेअरमन संतोष हलकरे, आदी नागरिक सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक बिराजदार यांनी केली, या कार्यक्रमाचे मनोगत व्यक्त करताना किरण पाटील विलास तपासे, विलास नवले, यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर गोरे, मोहन कांबळे, शेख सर, शशिकला गवलवाड, बनकर सर यांनी परिश्रम करून यशस्वी पार पाडले. स्वातीच्या आई वडिलांचा सत्कार जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आला. स्वातीला लातूर मध्ये शिक्षणाची सोय करून व मार्गदर्शन केल्याबद्दल गणेश कलशेट्टी, आणि पिसाळे यांचेही स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश दीक्षित यांनी मांडले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.