*बनावट फेसबुक अकाउंट उघडून महिलेची बदनामी करणाऱ्या आरोपीस अटक. लातूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कामगिरी...*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, काही दिवसापूर्वी लातूर येथे राहणाऱ्या एका महिलेचे फोटो व वैयक्तिक माहितीचा वापर करून अज्ञात आरोपीने खोटे बनावट फेसबुक अकाउंट ओपन करून त्यावरून पीडित महिलेची बदनामी करून त्रास देत असल्या चे तक्रार दिल्याने पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 191/2021 कलम 67 (अ) माहिती तंत्रज्ञान अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे सूचने नुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर ग्रामीण श्री. सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांनी सायबर सेल मदतीने गुन्ह्याचा तपास सुरू केला.
सदर गुन्ह्याचे तपासात नमूद अज्ञात आरोपीने तयार केलेल्या बनावट फेसबुक अकाउंट च्या तांत्रिक व सखोल विश्लेषण करून सदरचे बनावट फेसबुक अकाउंट तयार करून महिलेला विनाकारण त्रास देणारा आरोपी नामे
संतोष तुळशीराम बयवाड, वय- राहणार नांदेड
यास सदर गुन्ह्यात 18/03/2022 रोजी अटक करण्यात आली आहे. नमूद आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व दोन सिमकार्ड जप्त करण्यात आले असून सदरच्या आरोपीने बनावट फेसबूक अकाउंट तयार करून आणखीन कोणत्या महिला व मुलींची फसवणूक केली आहे काय याबाबतचा तपास सुरू असून पुढील तपास पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री गणेश कदम हे करीत आहेत.
सदरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री.गणेश कदम सायबर सेलचे पोलिस निरीक्षक रामेश्वर तट, सपोनि सुरज गायकवाड ,पोलीस अमलदार संतोष देवडे, शैलेश सुडे ,गणेश साठे ,प्रदीप स्वामी, राहुल दरोडे महिला पोलीस अमलदार अंजली गायकवाड यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.