लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा असल्याने त्याचा नियोजन करावे या मागणी साठी आमदार अभिमन्यु पवार आपल्या साहकार्य सह आंदोलन केले.
१२-१४ महिने झाले तरी लातूर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांचा ऊस शेतातच उभा असल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत. अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासंदर्भात सरकार काहीही हालचाल करायला तयार नाही. याउलट जाऊन सरकारने एफआरपीचे २ तुकडे करून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. शेतात उभा असलेल्या उसाच्या गाळपासाठी नियोजन करावे तसेच शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी द्यावा या मागण्यांसाठी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदार अभिमन्यु पवार आपल्या साहकार्य सह आंदोलन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.