शिवजयंती निमित्त बेलकुंड येथे अश्व चाल स्पर्धा.
लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्यांदाच अश्व स्पर्धेचे आयोजन.
औसा प्रतिनिधी विलास तपासे
मोठ्या गटात द्वितीय बक्षीस परभणीच्या वसीम अन्सारी यांच्या जासुसने तर तृतीय बक्षीस लातूरच्या सुलतान खोरीवाले यांच्या हिरो घोड्याने मिळविले. लहान गटात द्वितीय क्रमांक अहमदपूरच्या सय्यद अफजल खैराती यांच्या वीर घोड्याने तर तृतीय क्रमांक शाहजान खोरीवाले यांच्या टायगरने पटकाविला. अश्व प्रदर्शनात गौरव काथवटे यांच्या घोड्याने प्रथम, योगीराज पाटील यांचा अश्व द्वितीय तर गोविंद गाढवे यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला.
औसा तालुक्यातील बेलकुंड येथे सोमवारी पहिल्यांदाच अश्व दौड स्पर्धा पार पडली. यावेळी नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळाला. अश्व दौड पाहण्यासाठी जिल्ह्याबरोबरच मराठवाडा व सीमावर्ती भागातील नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. वाऱ्याच्या वेगात आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या गटात अंबाजोगाईच्या हुसेन गवळी यांच्या बुलेटने, तर लहान गटात बेलकुंडमधील विष्णू कोळी यांच्या बाहुबली घोड्याने प्रथम क्रमांक मिळविला.
आज तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त अश्व दौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बेलकुंड गावाशेजारील दिगंबर पाटील, विलास पाटील, यांच्या शेतात स्पर्धेसाठी मैदान तयार करण्यात आले होते. स्पर्धेत एकूण ३५ अश्वांचा सहभाग होता. स्पर्धेसाठी ५०० मीटरचे दोन ट्रॅक होते. लहान व मोठ्या गटात प्रत्येकी चार फेऱ्या झाल्या. प्रारंभी चाचणी फेरी होऊन अंतिम फेरीसाठी दोन्ही गटातून प्रत्येकी सात अश्व निवडण्यात आले होते
या स्पर्धेचे उद्घाटन छावा संघटनेच्या विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, भगवान माकणे, योगीराज पाटील, श्रीकांत सूर्यवंशी, नगरसेवक अजय कोकाटे, गौरव काथवटे, सुधीर पोतदार, भीमराव शिंदे, दिगंबर पाटील, सिध्दाजी जगताप, डॉ. हिरालाल निंबाळकर यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण प्रवीण कोपरकर, धनराज लोखंडे, सरपंच विष्णू कोळी, अनिल कोळी, यांच्या हस्ते झाले. पंच म्हणून माऊली बीडकर, बालाजी माने, राजेंद्र पाटील, धनू काझी, कुमार बचाटे आदींनी काम पाहिले.
यावेळी स्पर्धा समितीचे अध्यक्ष विलास मुकडे, सचिव अमित सोलापूरे, बालेखाँ पठाण, खंडू उबाळे, नागनाथ कोडे, श्रीमंत पाटील, श्रीशैल्य पाटील, किशोर लांडगे, शिवराज मुकडे, चैतन्य पाटील, दीपक वळके, बालाजी मुकडे, सखाराम पाटील, रघुवीर कोळी, आमिर पठाण आदी उपस्थित होते.
मोठ्या गटात द्वितीय बक्षीस परभणीच्या वसीम अन्सारी यांच्या जासुसने तर तृतीय बक्षीस लातूरच्या सुलतान खोरीवाले यांच्या हिरो घोड्याने मिळविले. लहान गटात द्वितीय क्रमांक अहमदपूरच्या सय्यद अफजल खैराती यांच्या वीर घोड्याने तर तृतीय क्रमांक शाहजान खोरीवाले यांच्या टायगरने पटकाविला. अश्व प्रदर्शनात गौरव काथवटे यांच्या घोड्याने प्रथम, योगीराज पाटील यांचा अश्व द्वितीय तर गोविंद गाढवे यांच्या घोड्याने तृतीय क्रमांक पटकावला.
अश्व स्पर्धा पश्चिम महाराष्ट्रात घेतली जाते. मराठवाड्यात या स्पर्धेचे परळी येथे आयोजन करण्यात आले होते. लातूर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच बेलकुंड तालुका औसा येथे अश्व चाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आता ही स्पर्धा प्रत्येक वर्षी शिवजयंती निमित्त बेलकुंड येथे घेण्यात येणार आहे. ह्या स्पर्धेसाठी मराठवाडय़ातून नांदेड परळी उस्मानाबाद जिल्ह्यातील आंदोर उमरगा, जळकोट, मराठवाडय़ातून पन्नास ते साठ अश्वानी सहभाग नोंदविला होता. अशी माहिती संयोजक तथा सरपंच विष्णु कोळी ( महाराज) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.