अचानक पणे आग लागल्याने आयशर टेम्पो जळून खाक
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बेलकुंड मोड येथे 7:30 च्या सुमारास अचानक पणे आयशर क्रमांक MH 12 TV 0288 ला आग लागून जळून खाक झाला आहे. ह्या आगीत कुठली जिवितहानी झाली नाही. टेम्पो मधील द्राक्षे चे कॅरेट ला आग लागून ही आग इतकी भयंकर होती की टेम्पो मधील सर्व कॅरेट जळून खाक झाले आहेत. कॅबिन मध्ये आग लागल्यामुळे कॅबिन चे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे हि आग आटोक्यात आली. पन्नास ते शंभर नागरिकांनी जिथे पाणी मिळेल तिथले पाणी घेऊन टेम्पो विझवण्याचा प्रयत्न केला. सामाजिक कार्यकर्ते खंडू उबाळे यांनी आपल्या आरो प्लांट चे पाणी टेम्पो विझविण्यासाठी दिले व त्यांच्या मदतीमुळे टेम्पो विझविण्यात मदत झाली. उशीरापर्यंत ह्या प्रकरणाची पोलिसात नोंद करण्यात आली नव्हती. हा टेम्पो कवळी तालुका औसा येथील असल्याचे समजते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.