स्वाती पवार या विद्यार्थिनीचा बेलकुंड ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार.

 स्वाती पवार या विद्यार्थिनीचा बेलकुंड ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार. 









औसा प्रतिनिधी 

स्वाती पवार या विद्यार्थिनीचा एमबीबीएस इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे निवड झाल्याबद्दल बेलकुंड ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. स्वाती  पवार ही बेलकुंड जिल्हा परिषद शाळेमधे इयत्ता नववी वर्गात शिकत होती. पुढील शिक्षण लातूर येेेथे घेण्यात आलेे. एमबीबीएस इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथे निवड झाल्याबद्दल बेलकुंड ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी बेलकुंड चे सरपंच विष्णु कोळी, उपसरपंच सचिन पवार, मंडळ अधिकारी अरूणा गरगटे, तलाठी गोविंद कुंभार,  ग्रामसेवक विकास फडणीस, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास तपासे, सम्राट युवा संघटनेचे अध्यक्ष सोमनाथ कांबळे, महंमद पठाण, ग्राम पंचायत सदस्य समाधान कांबळे, अजिंक्य अपसिंगेकर, विठ्ठल साळुंके, अशोक जाधव राजेंद्र शिंदे, अमित सोलापुरे, प्रमोद पवार, श्रीमंत पवार, व्हा. चेअरमन संतोष हलकरे, मेघराज देशमुख, शरद पवार, मंगेश कणकधर, लखन रसाळ, राणी उपासे, निवृत्ती पवार, उमेश कुलकर्णी, आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या