उज्जैनी जगद्गुरु यांच्या हस्ते काशिविश्वेश्वर मंदिराचा कलशारोहन सोहळा
औसा प्रतिनिधी
उज्जैनी जगद्गुरु यांच्या हस्ते काशिविश्वेश्वर मंदिराचा कलशारोहन सोहळा
औसा प्रतिनिधी
औसा तालुक्यातील गुळखेडा येथील काशी विश्वेश्वर मंदिराची उभारणी ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आली असुन या मंदिराचा कलशारोहण सोहळा उज्जैन पिठाचे श्रीश्रीश्री 1008जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृत हस्ते दि 28 मार्च रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त सकाळी 6 वाजता हिरेमठ संस्थानचे शिवभक्त परायण चंद्रशेखर हिरेमठ महाराज यांचा महारुद्र अभिषेक होणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीजगद्गुरू व कलशाची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .याप्रसंगी हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक श्री ष.ब्र.108 शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज तसेच हिरेमठ संस्थानचे पीठाधीपती श्री.ष.ब्र. 108 बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गुळखेडा येथील काशिविश्वेश्वर मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यानिमित्त उज्जैन पीठाचे श्रीमत् जगद्गुरु यांचे अमृत आशीर्वचन दुपारी 2 ते 5 या वेळेत संपन्न होणार आहे.तरी सर्व शिवभक्त आणि काशिविश्वेश्वर मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यासाठी आयोजित उज्जैन पिठाचे श्रीमत् जगद्गुरु यांचे आशिर्वचन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ गुळखेडा यांच्यावतीने करण्यात येते. तालुक्यातील गुळखेडा येथील काशी विश्वेश्वर मंदिराची उभारणी ग्रामस्थांच्या सहभागातून करण्यात आली असुन या मंदिराचा कलशारोहण सोहळा उज्जैन पिठाचे श्रीश्रीश्री 1008जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशिकेंद्र शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृत हस्ते दि 28 मार्च रोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमानिमित्त सकाळी 6 वाजता हिरेमठ संस्थानचे शिवभक्त परायण चंद्रशेखर हिरेमठ महाराज यांचा महारुद्र अभिषेक होणार आहे. सकाळी 10 वाजता श्रीजगद्गुरू व कलशाची गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे .याप्रसंगी हिरेमठ संस्थानचे मार्गदर्शक श्री ष.ब्र.108 शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज तसेच हिरेमठ संस्थानचे पीठाधीपती श्री.ष.ब्र. 108 बाल तपस्वी गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गुळखेडा येथील काशिविश्वेश्वर मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यानिमित्त उज्जैन पीठाचे श्रीमत् जगद्गुरु यांचे अमृत आशीर्वचन दुपारी 2 ते 5 या वेळेत संपन्न होणार आहे.तरी सर्व शिवभक्त आणि काशिविश्वेश्वर मंदिराच्या कलशारोहन सोहळ्यासाठी आयोजित उज्जैन पिठाचे श्रीमत् जगद्गुरु यांचे आशिर्वचन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन समस्त ग्रामस्थ गुळखेडा यांच्यावतीने करण्यात येते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.