शिऊर येथे सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे कीर्तन

 *शिऊर येथे सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराजांचे कीर्तन*





लातूर दि. महाराष्ट्रातील जागतिक कीर्तीचे ख्यातनाम सप्तखांजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज (आकोट) जिल्हा आकोला यांचे शिऊर ता. जिल्हा लातूर येथे शुक्रवार दि. २५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता   श्रीमती हरिबई गोविंद राव सूर्यवंशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ सभोवतालच्या ग्रामीण व शहरी जणते साठी जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

           राष्ट्र निर्माते थोर राष्ट्र संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांचेसह छ. शिवराय, मा जिजाऊ फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगत समाजातील वाढती व्यसनाधीनता, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर प्रहार करीत सद्यस्थितीतील दाखले देत खऱ्या अर्थाने कीर्तनाच्या माध्यमातून  मनोरंजनातून प्रबोधन करणारे प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांचे कीर्तनाचा लातूर जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी लाभ घ्यावा असे नम्र आवाहन गोविंदराव नामदेव सूर्यवंशी, महा. अंनिस चे प्रा. शिवाजी सूर्यवंशी, रामचंद्र सूर्यवंशी, माधव बावगे व समस्त सूर्यवंशी परिवार शिऊर यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या