बोरगाव(न)येथे आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप

 बोरगाव(न)येथे आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप



औसा- बोरगाव(न)येथे आयसीआयसीआय फाऊंडेशनच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर व चष्मे वाटप मंगळवार दि 01 मार्च 2022 रोजी

शिबिराचे उद्घाटन डॉ. शिल्पा टाक  व अनिल सुतार सरपंच बोरगाव यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी गावातील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.

एकूण 115 नागरिकांचे तपासणी करण्यात आली. ज्या रुग्णांना चष्माचा नंबर आहे अशा लोकांकरिता अल्प दरामध्ये चष्मा उपलब्ध करून देण्यात आला व आय ड्रॉप उपलब्ध करून देण्यात आला.

 रुग्णांना मोतीबिंदू , डोळ्यावर येणार्‍या पडदा ,डोळ्याची जळजळ ,डोळ्यांची घ्यावयाची काळजी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी लोकांनी डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे याबाबतचे मार्गदर्शन डॉ यांच्या कडून करण्यात आले.  

या आय सी आय सी आय शिबिराच्या माध्यमातून अनेक ग्रामस्थ या शिबिरात उपस्थित राहून या शिबीराचा लाभ घेतला. 

यावेळी गावचे सरपंच अनिल सुतार , डॉ.  शील्पा टाक,  नितीन गायकवाड ,करण नरवाडे डॉ. जयदेव साळुंखे , विठ्ठल जाधव , बालाजी जाधव,  राधाबाई उत्तेकर  तसेच आयसीआयसीआय फाऊंडेशनचे आनंद सूर्यवंशी, या सर्वांनी उपस्थित राहून हे शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या