शासकीय कामात अडथळा व धक्काबुक्कीच्या घटनेच्या संदर्भाने पोलीस अंमलदार व डॉक्टर यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल*

 *

*शासकीय कामात अडथळा व धक्काबुक्कीच्या घटनेच्या संदर्भाने पोलीस अंमलदार व डॉक्टर यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

          याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 28/02/2022 रोजी घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अमलदार श्री.काळे यांनी दिलेल्या फिर्यादि वरून पोलीस ठाणे शिवाजी नगर येथे डॉक्टर श्री.गोरे यांचे विरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक 110/2022 कलम 353 व इतर भा. द.वि. तसेच कलम 179 मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

           तसेच डॉक्टर श्री.गोरे यांचे फिर्याद वरून पोलीस अंमलदार दत्ता काळे यांचे विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 111/ 2022 कलम 324 व इतर भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे शिवाजीनगर चे पोलीस उपनिरीक्षक श्री.निळकंठे हे करीत आहेत. 

          सदर गुन्ह्यांचा तपास अत्यंत पारदर्शकपणे व सखोल पद्धतीने  करण्यात येत आहे. कायदेशीर कारवाई बरोबरच  प्रशासकीय कार्यवाही देखील चालू आहे.

              नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या