औरंगाबाद येथील महात्मा बसवेश्वर पुतळा विटंबना प्रकरणाचा औशात निषेध
औसा प्रतिनिधी
औरंगाबाद शहरातील बजाज नगर येथील जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे मोडतोड करून क्रांतिसूर्य बसवेश्वर यांच्या समर्थक कार्यकर्त्यांचा अवमान झाला आहे. महात्मा बसवेश्वरांनी मानव धर्माचा पुरस्कार करून संपूर्ण जगाला समतेचा संदेश दिला आहे. अशा या महामानवाच्या पुतळ्याचा बजाज नगर औरंगाबाद येथे कैलास भोकरे व त्याच्या सहकाऱ्यांनी मोडतोड करून पुतळ्याची विटंबना केली आहे. या प्रकरणाचा औसा येथील वीरशैव समाजाच्या वतीने निषेध रॅली काढून तीव्र निषेध नोंदविण्यात आला करणी दोषी असलेले कैलास भोकरे व त्यांचे सहकारी यांच्यावर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी वीरशैव समाज औसा यांच्या वतीने तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निषेध आंदोलनामध्ये वीरशैव समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.