नवी नवरी नांदाया आली रामजी सकपाळ कुळात या रमाई च्या गीता मुळे सोशल मीडियावर धूम.
औसा प्रतिनिधी
गीतकार धम्मायन इंद्रजित कांबळे यांचे स्वलिखीत रमाई गीत त्यांची आई उज्वला इंद्रजित कांबळे यांच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून प्रसिद्ध केले व सोशल मीडिया च्या माध्यमातून या गीताचा प्रसार करण्यात आला. नागरिकांकडून भरपूर प्रतिसाद मिळाला. गावातील नागरिकांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बाबासाहेब जेंव्हा शिक्षणासाठी परदेशी गेले होते तेंव्हा रमाबाई च्या झालेल्या आपेष्टा व संसारावर हे गीत धम्मायन कांबळे यांनी लिहिले व त्यांच्या आईच्या आवाजात रेकॉर्ड केले आहे. त्यामुळे सोशल मीडिया वर या गीताला प्रसिद्धी मिळत आहे. ग्रामीण भागाचा कलावंत काय असतो हे या आपल्या गीतातून त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
मातोळा तालुका औसा जिल्हा लातूर .
अतिशय गरीब कुटुंबातील कवी गीतकार समाज प्रबोधनकार धम्मायन इंद्रजित कांबळे .
समाज प्रबोधनाच्या माध्यमातून
समाज जागृतीचे काम करतात .
धम्मायन कांबळे हा गाव लेवलला राहुन गरीब झोपड्यातील मित्र सोबती घेऊन
गीत गायनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन गेल्या पंधरा वर्षापासून करतो .
त्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन
जातिप्रथेवरती लिखाणाच्या माध्यमातून हल्ला .
बुवाबाजी जादूटोणा
या अशा विषयावरती गायनाच्या माध्यमातून आपले परखड विचार मांडत असतो .
तो एक उत्कृष्ट साहित्यिक वक्ता आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही .
गावातील सर्व तरुण वर्ग धम्मायन कांबळे यांना वेळोवेळी त्याच्या या सामाजिक कार्याला गती मिळावी म्हणून निसंकोच पणे पाठिंबा देत असतात .
गावातील लहान-थोर बालबालिका शिक्षक स्टाफ
26 जानेवारी व 15 ऑगस्ट या दिवशी या मुलाचे व्याख्यानाचे कार्यक्रम शाळेवर ती घेत असतात .
या मुलाचे वडील 1972 साली एम ए दोन वर्ष लॉयर प्रॅक्टिस झालेले त्याकाळचे गावातील सर्वात अधिक शिकलेले पहिले व्यक्ती म्हणून त्यांची ओळख मातोळा गावाला झाली .
इंद्रजीत लिंबाजी कांबळे यांनी औसा तहसील कार्यालयासकाही महिने आपली सेवा दिली .
आणि काही महिन्यातच त्यांच्या नोकरीवर स्टे ऑर्डर आली
आणि तेव्हापासून ते सुशिक्षित बेकार झाले .
आई .उज्ज्वला इंद्रजीत कांबळे शिक्षण तिसरी
धम्मायन इंद्रजीत कांबळे शिक्षण 12वी .
क्रांती झोपड्यात असते या म्हणीप्रमाणे .
हा होतकरू तरुण शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या भटक्या विमुक्त जातीच्या मुलांवर ती कविता सादर करतो शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांची कविता सादर करतो .
आणि
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रित्यर्थ गीत गायनाचे समाज प्रबोधनाचे कार्य करतो .
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे राष्ट्रसंत गाडगेबाबा महात्मा बसवेश्वर बिरसा मुंडाअशा अनेक महामानवांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम करतो .
कालच आर पी स्टुडिओ च्या माध्यमातुन त्याच्या आईच्या आवाजात
गीत रिलीज झाले आहेत ते raajkumar pathade
यु ट्यूब चॅनल वरती उपलब्ध आहेत आणि सर्वांनी पाहावे आणि त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा द्याव्या .अशा कलावंताला आर्थिक गरज करण्याची मदत आहे. समाजातील नागरिकांनी ह्या कलावंताला मदत करावी. अशी मागणी जोर धरत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.