लातूर जिल्ह्यामध्ये 32 निजाम कालीन शाळा 95 वर्ग होणार.
44 शाळेची दुरुस्ती होणार.
औसा प्रतिनिधी
अनेक दिवसापासून निजाम कालीन बांधकाम असलेल्या शाळांना नवीन वर्ग देण्याची मागणी अनेक वेळा शालेय व्यवस्थापन समितीने जिल्हा परिषदेकडे केली होती. या मागणीवर शासनाने विचार करून जिल्ह्यातील 32 शाळांना 95 वर्ग मंजूर केले आहेत तसेच शाळा दुरुस्ती साठी 44 खोल्यांची दुरुस्ती होणार आहे. परंतु नवीन वर्गासाठी 10% लोकवाटा जमा करून शासनाकडे भरण्याची विनंती केली आहे.
भूमिपुत्र व बाहेरगावी राहणार्या नागरिकांकडून गावाच्या शाळेसाठी दहा टक्के लोकवाटा.
औसा प्रतिनिधी. विलास तपासे
जिल्हा परिषद शाळा यांनी चांगला दर्जा घेऊन विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. गावोगावी जिल्हा परिषद शाळेमधे प्रवेश घेऊन विद्यार्थी चांगल्या दर्जाचे शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेचा दर्जा सुधारल्यामुळे आणखीन इंग्लिश मीडियम मधील व संस्थेचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमधे प्रवेश घेत आहेत. गावोगावी शालेय व्यवस्थापन समितीने आपल्या गावचा शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे यासाठी अतोनात परिश्रम केले आहे. त्या परिश्रमाला शिक्षकांनीही पात्र होऊन विद्यार्थ्याला चांगल्या प्रकारचे शिक्षण दिल्यामुळे अनेक ग्रामीण भागात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा अनेक परीक्षा मध्ये आपल्या गावाचे व शाळेचे नाव केले आहे. मिशन बाला 500 साठी आपण मोठ्या प्रमाणात लोकसहभाग मिळविण्यात यशस्वी होत आहोत व उर्वरित शाळांमध्ये ही लोकांचा सहभाग वाढावा शाळे बद्दलची आपुलकी वाढावी या उद्देशाने स्वदेस अभियान पुन्हा नव्याने सुरू करण्यात येत आहे या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक भूमिपुत्र बाहेर इतरत्र परदेशात आपापल्या क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत त्यांना स्वतःचे ज्या शाळेत शिक्षण झाले त्या शाळेविषयी निश्चितच आपुलकी असते व त्या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते यथायोग्य मदत करण्यास नेहमीच तयार असतात सध्या दीपावलीच्या सणानिमित्त बहुतांश माजी विद्यार्थी गावाकडे येतात या संधीचा लाभ घेऊन सर्व जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांनी व शालेय व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी भूमिपुत्र यांची शाळेतच बैठक आयोजित करावी या बैठकीत शाळेच्या प्रगतीचा आढावा द्यावा त्यानंतर शाळेच्या आवश्यकतेनुसार योगदान देणे बाबत आवाहन करावे जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधणे व 44 शाळांचा इमारतींची दुरुस्ती करण्यासाठी शासन निर्णय झालेला आहे यानुसार एकूण मंजूर तरतुदीच्या दहा टक्के लोक वाटा असणे गरजेचे आहे म्हणून याही ठिकाणी स्वदेस अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी आपल्या सुलभतेसाठी मिशन बाला साठी व निजाम कालीन शाळांसाठी असे दोन वेगवेगळे पत्र देत आहे आवश्यकतेनुसार त्या पत्राची प्रिंट काढून आता व्हाट्सअप द्वारे माजी विद्यार्थी भूमिपुत्र यांना देण्यात यावे. असे पत्र लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गट शिक्षण अधिकारी व पंचायत समिती यांच्या मार्फत प्रत्येक शाळेला देण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.