*आता दर शनिवारी भरणार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर कार्यालयात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुलांच्या पालकांची शाळा..*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की,अलीकडच्या काळात अल्पवयीन मुलाकडून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणे, घातक शस्त्र हातात घेऊन ते फोटो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हाट्सअपग्रुप वर शेअर करण्याचे प्रमाण वाढले आहे. मुलं जशी जशी मोठी होत जातात तसं तसं नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांच्यातील कुतूहल वाढत असतं... आपल्या मित्रांमध्ये रमण्याचे वयात मुलं तासनतास सोशल मीडियावर दिसतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अनेक मुलं काही एक विचार न करता आक्षेपार्ह पोस्ट सेंड करतात,व्हायरल करतात. त्यामुळे त्यांच्याकडून नकळत कायद्याचे उल्लंघन होते. यांच्यावर गुन्हे दाखल होऊन करियर धोक्यात येण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांचे संकल्पनेतून जे मुलं सोशल मीडियाच्या आहारी जाऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी आक्षेपार्ह पोस्ट करतात अशा पोस्टचा शोध घेऊन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या मुलांना त्याच्या पालकांसह बोलावून घेऊन त्यांचे मुलाने सोशल मीडियावर केलेले पोस्ट दाखवून ते त्यांच्याकडूनच डिलीट करून घेऊन त्यांना समज देण्याचे मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या गुन्ह्यांना आळा बसेल.
त्याप्रमाणे दिनांक 28/03/2022 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, लातूर शहर येथे लातूर मध्ये राहणारे व व्हाट्सएप, इंस्टाग्राम, फेसबुकद्वारे आक्षेपार्ह पोस्ट करणारे एकूण 06 अल्पवयीन मुलांसह त्यांच्या आई-वडील,पालकांना बोलावून घेऊन त्यांच्या मुलाने सोशल मीडियावर केलेले पोस्ट निदर्शनास आणून त्यातून होणाऱ्या कायद्याचे उल्लंघन व त्याच्या शिक्षेबाबत माहिती देण्यात आली. यानंतरही त्यांच्याकडून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तशी नोटीस पालकांना देण्यात आली. तसेच त्यांच्या मुलाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले.
सदरची मोहीम यापुढे पण अशीच चालू राहणार असून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट,फोटोज, व्हिडिओ सेंड करणारे युजर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येणार आहे.
तसेच पालकांना मुलांकडे लक्ष न दिल्याबद्दल उपहासात्मक प्रतिकात्मक असे एक 'साभार परत' प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हेतू फक्त एव्हढाच की आपल्या पाल्याविषयी पालक अजून जागरूक व्हावे व भविष्यात तो आणखी बिघडणार नाही याची दक्षता घेऊ शकतील. त्यांच्या चुकीच्या दिशेने वाहत जाणाऱ्या पाल्यांचे योग्य मार्गदर्शन करून त्यांना साभार परत आपल्या पालकांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शन विभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात उपविभागीय कार्यालयाचे विशेष पथक व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अमलदार तसेच सायबर सेलच्या पथकाद्वारे राबविण्यात येणार आहे.
*लातूर पोलिसांकडून लातूरकरांना आवाहन....*
👉🏿पालकांनी त्यांची मुलं इंटरनेट किंवा सोशल मीडियाचा योग्य वापर करतील याची काळजी घ्यावी.
👉🏿सोशल मीडियावर अल्पवयीन मुल काय बघतात याची माहिती घ्या.
👉🏿 मुलाचा फोन तुमच्या जी-मेलशी कनेक्ट करा असं केल्यास चॅट बॅकअप, फोन हिस्ट्री आणि फोटो गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह येतील, जे पाहणं पालकांना शक्य होईल.काही आक्षेपार्ह आढळलं, तर त्यावर लगेच रिअॅक्ट न होता शांतपणे संवाद साधा.
👉🏿सोशल मीडियावर अनेक धोकादायक गोष्टी आहेत, ज्यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. ट्रोलिंग, पॉर्न शेअरिंग सारख्या गोष्टींमध्येही मुलं अडकली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा. संवाद हाच सर्वोत्तम उपाय असून यामुळे सर्व गोष्टी सहज होऊन जातील.
👉🏿 मुलांना सतत उपदेश देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधा.
👉🏿 सोशल मीडिया वापरण्या संदर्भात मुलांना नियम आखून द्या. आणि त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणीही करा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.