*औसा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. जिलानी पटेल तर सचिवपदी डॉ. संदीप खानापूरकर.*
औसा:- लातूर जिल्ह्यातील *औसा तालुका होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशनची* बैठक डॉ.विनोद बिराजदार यांच्या अध्यक्षतेखाली दि. 20/03/2022 रोजी पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी *डॉ. जिलानी पटेल* यांची तर *डॉ.संदीप खानापुरकर* यांची सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी डॉ.विनोद जाधव (अशिव) तर डॉ. भीमराव पवार (किल्लारी) यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
येणाऱ्या काही दिवसांमध्ये तालुक्यातील जनतेच्या आरोग्याबाबतीत जनजागृती, होमिओपॅथी उपचार पद्धतीचा प्रचार-प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे तसेच तालुक्यातील होमिओपॅथीक डॉक्टरांच्या समस्या सोडवण्यास व त्याचा पाठपुरावा करण्यास प्राधान्य राहणार आहे असे नवनियुक्त अध्यक्ष व सचिव यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे.
सल्लागारपदी डॉ सोनवणे ,डॉ विनोद बिराजदार,
डॉ श्रीनिवास नोगझा यांचं मार्गदर्शन लाभणार आहे.
या बैठकीस डॉ झाकेर सय्यद, बुधोडा,डॉ विनोद जाधव, उजनी,डॉ शाहनवाज लोहारे, औसा,डॉ भिमराव पवार, किल्लारी,डॉ किशनराव ठाकूर, टाका,डॉ चाॅंद शारवाले, लामजना,डॉ बिलाल पटेल, लामजना,डॉ कासेकर, नागरसोगा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.