अल्लाह"च्या धास्तीने निघणारे अश्रूं मोतीपेक्षाही श्रेष्ठ, मृत्यूयेण्याआधीच तोबा करा

 "अल्लाह"च्या धास्तीने निघणारे अश्रूं मोतीपेक्षाही श्रेष्ठ, मृत्यूयेण्याआधीच तोबा करा


हाफिज मो.मुक्तदीर साब कुरैशी,उदगीरात शबे-ए-बरात निमित्त कार्यक्रम





उदगीर

जीवन हे नश्वर आहे.ते कधीही संपेल.त्याकरिता मृत्यू येण्याआधीच त्यांची तयारी करा.वेळ गेल्यावर त्याचा उपयोग होणार नाही.अल्लाह व पैगंबर नाराज होतील,असे कार्य न करता झालेल्या चुकीबाबत अल्लाहकडे पवित्र अंतकरणाने क्षमा याचना करा.नक्कीच ईश्वर तुम्हाला क्षमा करेल.तुमच्या डोळ्यातून अल्लाहाच्या धास्तीने निघणाऱ्या  अश्रूं मोल मोतीपेक्षाही अधिक अनमोल आहेत.हे अश्रू तुमचा नर्काच्या आगीपासून बचाव करतील.तुम्ही अल्लाहाचे गुलाम बना,सारी कायनात तुमची गुलामगिरी करेल,पण हेतू स्वच्छ असणे आवश्यक आहे.असे

 उपदेश हैद्राबाद येथील हाफिज व कारी शाह मो.अब्दुल मुक्तदीर साब कुरैशी यांनी केला.


शुक्रवारी शबे-ए-बरात निमित्त बेगजी मस्जीद मध्ये झालेल्या धार्मिक कार्यक्रमात त्यांनी उपस्थित जनसमुदायाला उपदेश केले.यावेळी तेलंगणा, आंध्रासह कर्नाटक, लातूर,औसासह अनेक ठिकाणाहुन लोक आले होते.उपदेश करताना हाफिज साब पुढे म्हणाले,तुम्हाला सातो जमीन, सातो असमान मध्ये कुठेही अल्लाहाला शोधण्याची गरज नाही. तो तुमच्या ह्दयात आहे.ते अनुभवायला आले पाहीजे.त्याकरिता स्वच्छ मन अंतकरण पवित्र असणे गरजेचे आहे. बे डाग ह्दयाच्या मोबदल्यात स्वर्ग देण्याचा वादा अल्लाहाने केला.त्यासाठी मन दुर्गंधीमुक्त करा,सतकार्य करत पैगंबराने दाखविलेल्या मार्गाचे अवलंब करून तुमचे जीवन सार्थक करा.जो अल्लाहला जानतो,तोच बेहतरीन इन्सान,जो जाणूनही मनमानी करतो.तो बत्तरीन इन्सान असल्याचे हाफिज मुक्तदीर साब यांनी सांगितले.भूतलावरील मणुष्यासाठी महंमद पैगंबरांचे जीवन एक आरसा असून तो पहा,त्यांचे अनुकरण करा.यातच अल्लाहाने सिफा ठेवल्याचे त्यांनी सांगितले.


राजकारण करा,पण ते स्वच्छ व जनहितार्थ असले पाहिजे

----------------------

सध्याच्या युगात राजकारणाभोवती सर्वकाही चालते.तुम्ही आवश्य राजकारण करा.पण ते स्वच्छ असण्यासह त्यात मानव हिताबरोबर देशहितही आवश्यक असले पाहिजे. असाच राजकारणाला इस्लाम परवानगी देते.धोखाधडी, खोटे बोलणे,जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना येथे महत्व नाही.तुम्हाला जर कुणामुळे त्रास होत असेल तर त्याचा विरोध करण्यापेक्षा त्याच्या विधात्यालाच  राजी करा.तो आपोआप संपतो.कारण जो कुणी अल्लाहशी तालुक ठेवतो.त्याला कुणालाही घाबरण्याची गरज नाही. तुमच्या वरील सर्व संकट तो नाहीसे करतो.मात्र तुम्ही ईश्वराशी एकनिष्ठ असणे गरजेचे असल्याचे हाफिज साब यांनी सांगितले.


अमन व भाईंचाऱ्यांकरिता दुआ

---------------------------

हाफिज मो.मुक्तदीर साबने देशात अमन भाईंचार कायम राहण्यासह सिमेवर लढत असलेल्या सैन्यासह सलामती(सुरक्षेसाठी)विशेष दुआ केली.देशावर कोणतेही संकट येवू नेय,सतत उन्नती व प्रगतीसह सुजलाम, सुफलाम व्हावे,अशी प्रार्थना अल्लाहाकडे करण्यात आली.


तरूणानो व्यसनाधीन होवून आयुष्य संपू नका,तुम्ही उद्याचे भविष्य

------------------------

सध्याच्या युगात तरुण पिढीला व्यसनाधीनता लागलेले शाप आहे.यामुळे एकाचे नव्हे तर तब्बल चार आयुष्य संपते.त्यामुळे  अल्लाहाने तुम्ही उत्तम आरोग्य, सुंदर शरीरयष्टी सर्व अवयव दिले.ते गुटखा, गांजा,दारू,खावून आयुष्य संपविण्यासाठी नव्हे. तर अल्लाहाची इबादत करण्यासाठी.शरीर हे अनमोल देण आहे.त्याचा सांभाळ करा.कारण तुम्ही देशाचे भवितव्य असून असेच जीवन बरबाद करू नका.तुमच्या जाण्याने पत्नी,आई,वडिलासह तुमचे मुले अनाथ होतात.हौस करा,ते अल्लाहची इबादत करण्याची करा.पैगंबराच्या जीवनांचे आचरण करून यशस्वी व्हा.हे जग संपणार असून आखिरतची तयारी करण्याचे आवाहन युवापिढीना त्यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या