आमदार अभिमन्यु पवार यांनी आज लक्षवेधीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या अनास्थेमुळे पीएम किसान सन्मान निधीच्या लाभांपासून वंचित राहिलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या व्यथेकडे सरकारचे लक्ष वेधले.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी यांनी शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांचे शास्वत अर्थसहाय्य देणारी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना लागू केली. या योजनेअंतर्गत देशातील जवळपास ११ कोटी तर महाराष्ट्रातील १ कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाते. आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे माझ्या लातूर जिल्ह्यातील जवळपास २५००० शेतकऱ्यांसह राज्यभरातील लाखो शेतकरी पात्र असूनही या योजनेच्या लाभांपासून वंचित आहेत. "शेतकऱ्यांची चुकलेली माहिती दुरुस्त करण्यासाठी सुरु केलेले संकेतस्थळ मागच्या अनेक दिवसांपासून बंद आहे तसेच महसूल विभागाने दुरुस्तीच्या कामांवर अघोषित बहिष्कार टाकला असल्याचे" दुर्भाग्यपूर्ण वास्तव्य सभागृहात मांडून वंचित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने विशेष अभियान राबवावे अशी आग्रही मागणी आमदार पवार यांनी केली. सरकारी अनास्थेमुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीला कोण जबाबदार? सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार? अशीही विचारणा यावेळी सरकारला केली.
प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांनी महाराष्ट्रातील जवळपास ८ लाख ८६ हजार पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे मान्य केले व या शेतकऱ्यांना लाभ मिळावे यासाठी २५ मार्चपासून एक विशिष्ठ अभियान हाती घेणार असल्याची घोषणा केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.