लातूर जिल्हा परिषदेचा हृदयस्पर्शी पुरस्कार वितरण सोहळा-लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक, आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श मदतनीस पुरस्कार समारंभ संपन्न

 *लातूर जिल्हा परिषदेचा हृदयस्पर्शी पुरस्कार वितरण सोहळा---

 *लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक, आदर्श पर्यवेक्षिका, आदर्श अंगणवाडी सेविका, आदर्श मदतनीस पुरस्कार समारंभ संपन्न



लातूर प्रतिनिधी -- राहुल शिवणे

 लातूर जिल्हा परिषदेने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भव्यदिव्य पद्धतीने केलेल्या नियोजनामध्ये आदर्श शिक्षक, आदर्श अंगणवाडी कार्यकर्ती,आदर्श मदतनीस, आदर्श पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

दोन वर्षाच्या कार्यकाळात शिक्षकांचे प्रश्न सोडवत असताना एक भावनिक नाते तयार झाले असून आज  गुरुजणांचा सत्कार सोहळा पार पाडत असताना मनस्वी आनंद होत आहे. असे  मनोगत जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र शासनाने लातूर जिल्हा परिषदचे हॅपी होम, बाला या दिशादर्शी उपक्रमासाठी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे . व संपूर्ण राज्यात लातूर चे उपक्रम राबवणार आहोत असे ठरवले आहे.

पुढे बोलताना अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले की,

आपल्या कार्यकाळात अनेकांचे प्रश्न सोडवता आले.त्यामुळे भावनिक जिव्हाळा निर्माण झाला आहे.

कोरोना काळात जिल्ह्यातील शिक्षकांनी,सुपरवायझर,अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस यांनी अतिशय जबाबदारीने काम केले आहे.


कोव्हीड मुळे दोन वर्षाचे आदर्श पुरस्कार एकदाच देतो आहोत.

आपल्या कार्यकाळात अनेक चांगले निर्णय घेतले. Dcps चा पूर्ण हिशोब व व्याजाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खाती जमा करण्यात आली. Cmp प्रणाली चालु केली.आंतरजिल्हा बदलीने भूमिपुत्रांना जिल्ह्यात सामावून घेतले.

जवळपास 5 तास चाललेल्या कार्यक्रमात प्रत्येक जण कौतुक करत होता.अतिशय शिस्तबध्द व देखणे नियोजन या पुरस्कार सोहळ्याचे  करण्यात आले होते.


*चौकट*


*पुरस्कार कार्यक्रमाचे दिमाखदार नियोजन केल्याबद्दल व अतिशय कमी वयात केलेल्या यशस्वी कामगिरी बद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांचे सर्वजणकौतुक करून अभिनंदन करताना दिसत होते*.


महाराष्ट्र सरकार चे राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी पूर्ण वेळ उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली.

भाजपा जिल्हाध्यक्ष रमेश आप्पा कराड यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे व सहकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचा बहुमान वाढवला आहे.असे म्हणत कौतुकाची थाप दिली.

माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की, लातूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात आल्यापासून अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले व विविध उपक्रम घेऊन जिल्हा परिषदेचा लातूर पॅटर्न तयार केला आहे.     आजचा  पुरस्कार वितरण सोहळा हा भव्य दिव्य होत आहे.सर्व पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आहोत...जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष भारतबाई सोळुंके व सर्व सहकारी यांचे सुद्धा अभिनंदन करतो.


महाराष्ट्र शासनाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी या कार्यक्रमात पूर्ण वेळ उपस्थित राहून पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचे कौतुक केले व या अतिशय देखण्या व नियोजनबद्ध कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल जिल्हा परिषद प्रशासनाचे अभिनंदन केले.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर हे होते  तर प्रमुख उपस्थिती राज्यमंत्री संजय बनसोडे,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेश आप्पा कराड ,लातूर जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे,भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, उपाध्यक्षा भारतबाई सोळुंके, महिला व बालकल्याण सभापती ज्योतीताई राठोड, कृषी सभापती गोविंद चिलकुरे, समाजकल्याण सभापती रोहिदास वाघमारे,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद आप्पा लातुरे, माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके,महिला बालकल्याण उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,शिक्षणाधिकारी प्राथमिक वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी माध्यमिक नागेश मापारी,यासह महिला बालकल्याण विभागातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी यासह पुरस्कार प्राप्त शिक्षक, शिक्षिका, cdpo, अंगणवाडी कार्यकर्ती मोठया संख्येने उपस्थित होते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या