फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन

 

फिरकीचा जादूगार शेन वॉर्नचे निधन




SHARES


कॅनबेरा  -ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेग स्पिनर आणि फिरकीचा जादूगार म्हणून ओळखला जाणारा खेळाडू  शेन वॉर्न  यांचे आज हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.तो ५२ वर्षांचा होता.आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत त्याने १००१ बळींचा विक्रम केलेला आहे.पैकी  १४५ आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात त्याने ७०८ तर १९४ आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात २९३ बळींचा विक्रम गाठलेला आहे.१३ सप्टेंबर १९६९ रोजी जन्मलेल्या शेन वॉर्न याने कसोटी क्रिकेटपटू म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली होती.तर १९९३ मध्ये त्याने वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले.त्याच्या निधनामुळे क्रिकेट जगतावर आणि त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.भारतीय क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर याचा तो चांगला मित्र होता.राइट आर्म लेग स्पिन गोलंदाज असलेल्या शेन वॉर्न याने सचिनचे सर्वाधिकवेळा बळी  घेतले आहेत,तर सचिननेही त्याची गोलंदाजी अनेकवेळा फोडून काढलेली आहे.आपल्या ‘नो स्पिन’ या आत्मचरित्रात शेन वॉर्न याने ‘सचिन आपल्या रोज स्वप्नात येतो आणि माझी बॉलिंग ठोकून काढतो’असे म्हटले होते.२००७ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली होती.आपल्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत तो एकही शतक काढू शकला नाही.मात्र त्याची सर्वाधिक धावसंख्या ९९ इतकी आहे.संपूर्ण कारकिर्दीत त्याने ३४८७ धावा केलेल्या आहेत.एका सामन्यात १० बळी घेण्याचा विक्रम त्याने दोन वेळा केलेला आहे.ऑष्ट्रेलियाने १९९९ साली जिंकलेल्या वर्ल्डकप मध्ये त्याची भूमिका महत्वाची होती.आयपीएलमध्ये तो तीन वर्ष राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. वैयक्तिक जीवनातील वादग्रस्त वर्तनामुळे तो अनेकदा अडचणीत देखील आला होता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या