सेलू येथे शाळेची रंगरंगोटी
औसा तालुक्यातील सेलू येथील ग्रामस्थ आणि शाळा व्यवस्थापन समिती च्या वतीने सेलू येथे शाळेची आकर्षक रंगरंगोटी जि प प्रा शाळा केंद्र सेलू शाळेची रंगरंगोटी करण्यात येत आहे,यावेळी ग्रामसेवक शिल्पा कुलकर्णी ,सरपंच कविता कदम यावेळी म्हणाले शाळेच्या रंग रंगोटी साठी जी खर्च होईल गावकऱ्यांच्या, ग्रामपंचायतचे सहकार्य मिळत आहे असे म्हणाले
यामुळे गावाच्या सौदर्यातही भर पडली असून विद्यार्थ्यांना जाता-येता, बसता-उठता गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासही मदत होत आहे. त्यामुळे गावच आता शाळा झाले असून गावतील भिंती या फळ्याची कामगिरी बजावत आहे. या नव्या उपक्रमामुळे गावातील चिमुकल्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.आता भिंतीच वाचायला लागलेगावातील शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांनी गावातील ओसाड पडलेल्या भिंती चित्राच्या माध्यमातून बोलक्या केल्या आहे. या भिंतीवर चौदाखडी, गणितीय सूत्रे, समीकरणे व अपूर्णांकाच्या आकृती, शाब्दिक उदाहरणे, विषय सोपा परिच्छेद वरून माईंड मॅप, मुळ संख्या, संयुक्त संख्या, रोमन संख्या, मराठी महिने, इंग्रजी महीने, संख्यांचा चार्ट, लिहिण्यासाठी ब्लॅक बोर्ड इत्यादी विषयांसंदर्भात चित्र रेखाटले आहे. आता गावातील मुले हसत-खेळता या भिंती वाचतात. यामुळे गावात शैक्षणिक वातावरणात निर्माण झाले. या शैक्षणिक उपक्रमाला प्रत्यक्षात साकारण्यासाठी सरपंच कविता कदम , उपसरपंच शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळेतील शिक्षक तसेच व गावकºयांचे सहकार्य मिळाले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.