भीमाशंकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी शिक्षकांना ट्रॉफी व भेट वस्तू देऊन केले सत्कार

 भीमाशंकर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यानी शिक्षकांना ट्रॉफी व भेट वस्तू देऊन केले सत्कार








औसा प्रतिनिधी. विलास तपासे 

औसा तालुक्यातील टाका येथील भीमाशंकर विद्यालयात ssc मध्ये 1999 ते 2000 या विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शालेय जीवनातील आठवणीना उजाळा होण्यासाठी ह्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ह्या मेळाव्यासाठी तीस ते पस्तीस विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवून भीमाशंकर विद्यालयातील शिक्षकांना चाळीस इंची एलएडी टीव्ही, टेबल खुर्च्या अशी एकूण चाळीस हजार रुपयांचे साहित्य व ट्रॉफी हार, शाल घालून शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेमधे विद्यार्थ्यांना शिकवून त्यामधले काही शिक्षक चांगले शिक्षण दिल्यामुळे त्यामधले काही विद्यार्थी डॉक्टर, शिक्षक, विद्युत महामंडळ मध्ये, काही अॅडव्होकेट, व्यापारी, प्रगतशील शेतकरी, झाले एका WhatsApp ग्रुप मॅसेजवर सर्व माजी विद्यार्थ्यानी एकत्र येऊन आपल्या गावातील शाळेतील शिक्षकांचा सत्कार व शाळेतील स्नेह मेळाव्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भीमाशंकर विद्यालयाचे मुख्याध्यापक आत्तार इक्बाल सलाआओद्दीन, प्रमुख पाहुणे म्हणून पाटील दयानंद बाबुराव, अशोक कदम, पंडित शिंदे, मोरे फुलचंद, शिंदे अरुण तात्याराव, विलास शिंदे, पत्रकार विलास तपासे आदी मान्यवर उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाची प्रास्ताविक अरुण शिंदे यांनी केली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पटने दिलीप त्यावेळी डॉक्टर प्रमोद लोकरे, गोरे समाधान, शिंदे रंजीत, मोरे प्रदिप, स्वामी शिवशंकर, शेख लाला, पांचाळ लक्ष्मण, घोडके शिव शंकर, शिंदे विकास, भीमाशंकर, जाधव अमोल, भुसारे बाबासाहेब, शिंदे विनोद, शेळके उमेश, मोरे काकासाहेब गरड महादेव, पवार सुनील, शेळके नवनाथ, गव्हाणे शिवाजी, गोरे तानाजी आदी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक मान्यवरांचे त्यावेळी मार्गदर्शन झाले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हाताने शाळेच्या परिसरामधे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी बोलताना मुख्याध्यापक आत्तार इक्बाल म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या अश्या प्रेमामुळे भीमाशंकर विद्यालयाची प्रगती झाली आहे शाळा सुरू करत असताना एका छोट्या कुडाच्या पत्र्याचा डबा उभा करून शाळा उभा केली होती. पण आज  वटवृक्ष निर्माण झाले आहे. अनेक वेळा शाळेने आपली गुणवत्ता सिद्ध करून तालुका जिल्हा वर आपली मान उंचावली आहे. विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आहे. माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देऊन विद्यार्थ्यांचे ऋण व्यक्त केले. आम्ही जे शिकलो ते आज समाजापुढे आदर्श निर्माण करून दिला अशी तुमची प्रगती व्हावी भीमाशंकर विद्यालयाचे नाव मोठे व्हावे अशी अपेक्षा केली. या कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थी व शिक्षकांच्या आनंद व्यक्त होत होते. हा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या