*खादिमाने उर्दू व भाषा संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठतर्फे मराठी भाषा गौरव दिवस साजरा*
सोलापूर- ‘उर्दू व मराठी भाषांना जवळ आणण्यासाठी दोन्ही भाषेतील शिक्षक महत्वाची भूमिका बजवू शकतात, उत्कृष्ट मराठी व उत्कृष्ठ उर्दू बोलण्यासाठी त्यांना जर परिशिक्षणांची गरज असेल तर पुण्यात आज़म कॅम्पसमध्ये आम्ही करायला तयार आहोत’, असे उदगार ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. पी.ए. इनामदार यांनी काळले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे भाषा संकुल व खादिमाने उर्दूतर्फे आयोजित ‘उर्दूचा मराठीवर व मराठीचा उर्दूवर प्रभाव’ याविषयावर राष्ट्रीय वेबिनारमध्ये अध्यक्षस्थानावरून बोलताना काळले. पुढे ते म्हणाले की, उर्दू व मराठीचे संयुक्त साहित्य संमेलन आयोजित केले पाहिजे जेणे करून दोन्ही भाषा समृध्द होतील व एकमेकांचे नाते मजबूत होतील. दोन्ही भाषेतील साहित्याचे तुलनात्मक अध्ययन केल्यास आपल्यातील उणीवा कशे काढता येईल याचा विचार केला जाईल व भाषांमध्ये आदान प्रदान झाल्यास भाषा सशक्त होतात.’
प्रारंभी भाषा संकुलच्या डॉ. आयेशा पठाण यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू यांनी डॉ. पी.ए. इनामदार यांचा व डॉ. सुमय्या बागवान यांनी प्रमुख पाहुणे डॉ. याह्या नशीत यांचे स्वागत केले. फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी मराठी भाषा गौरव दिवस साजरा करण्याचे उद्दिष्टे सांगितले.
डायरेक्टर भाषा संकुल डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी विद्यापीठातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली व उर्दू विभागाचा गौरव केला. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ मराठी लेखक डॉ. याह्या नशीत यांनी सांगितले की उर्दू व मराठीचे नाते हे सतराव्या शतकापासून आहेत व सुफी संताने या क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. आपसात द्वेषाची भावना दूर करणे व आपण माणसामध्ये प्रेम व भाईचारा वाढविण्यासाठी त्यांनी भाषांचा उपयोग केला. संत तुकाराम, संत रामदास, तुकडोजी महाराज यांनी मराठीमध्ये उर्दूचा उपयोग केला तर शाह मुर्तुजा, लतीफ शाह, हुसेन अंबर खान यांनी मराठीचा उर्दू भाषेत उपयोग करून दाखविला ही परंपरा आजपर्यंत चालू आहे.
मराठीचा साहित्य उर्दूमध्ये व उर्दूचा साहित्य मराठीमध्ये आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे असेही त्यांनी सांगितले. मराठी भाषेत उर्दूचे अनेक शब्द समाविष्ट झाल्याने त्याच्या सौंदर्यात निखार आली आहे जसे अर्ज, दरख्वास्त, मजकूर, रूजू, दर्जा, पेशी, रजा वगैरे. या वेबिनारमध्ये देश विदेशातून 80 लोक सामील झाले होते. शेवटी डॉ. आयेशा पठाण यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.