.प्राचार्य.डॉ.इ.जा.तांबोळी यांना राष्ट्रीय पुरस्कार

प्राचार्य .डॉ.इ.जा.तांबोळी यांना राष्ट्रीय पुरस्कार





सोलापूर सोशल आर्टस अँड कॉमर्स कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी यांना जागातिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर या संस्थेकडून प्र.प्राचार्य डॉ.इ.जा.तांबोळी यांच्या " शामचा बाप " या कांदबरीला बाबुराव बागुल हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. प्र. प्राचार्य डॉ.इ.जा. तांबोळी हे सन. 1995 पासून ते लेखन करीत आहेत. त्यांनी कथा, कविता, ललित समिक्षा, चरित्र, कांदबरी इत्यादी. वाडमयप्रकारात लेखन केलेले आहे. प्र. प्राचार्य डॉ.इ. जा. तांबोळी यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. प्र. प्राचार्य डॉ.इ.जा. तांबोळी सोलापुरात विविध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व सभासद आहेत. त्यांनी अनेक उल्लेखनीय काम केलेले आहे. आज ते आर.पी.आय.चे महाराष्ट्र राज्यचे उपाध्यक्ष आहेत. प्र.प्राचार्य डॉ.इ.जा.तांबोळी यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन केलेले आहेत. तसेच त्यांचे एकशे दहा संशोधनपर लेख राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय नियत कालिकेत प्रकाशित झालेले आहेत. आजअखेर त्यांच्या चोवीस पुस्तकांचे प्रकाशन झालेले आहे. ते आंबेडकर चळवळीचे खंदे पुरस्कर्ते आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा दीक्षाभूमी नागपूर येथे दिनांक 27.03.2022 रोजी राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जागातिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मा. दीपककुमार खोब्रागडे, कार्यध्यक्ष डॉ. गोविंदराव कांबळे, सरचिटणीस मा. सुजित मुरमाडे, कार्यवाह डॉ. रविद्रं तिरपुडे यांनी हा पुरस्कार जाहीर केलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या