बहुजन टायगर प्रतिष्ठानच्या वतीने धम्मायन कांबळे याना समाजरत्न पुरस्कार ने केले सम्मानीत
औसा प्रतिनिधी
बहुजन टायगर प्रतिष्ठान च्या वतीने महाड क्रांती दिनाच्या निमित्ताने धम्म परिषद चे औचित्य साधून भीम शाहीर धम्मायन कांबळे याना समाज रत्न पुरस्कार देण्यात आला.
मु . पो .मातोळा ता . औसा जिल्हा लातूर येथील रहिवासी असून आपल्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी कला . क्षेत्रांमध्ये आपले प्रभुत्व कायम ठेवले आहे . धम्मायन कांबळे एक गीतकार .साहित्यकार, समाज प्रबोधनकार, कुशल अभिनय नट विवीध नाटकामध्ये सुद्धा अनेक भूमिका केल्या .
वहिनी मला माफ कर, मंगळसूत्र, वैरी मंगळसूत्राचा. अशा अनेक नाटकातून सुद्धा त्यांनी अमीट छाप सोडली . कला क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय विद्रोही प्रबोधनकार कैलास दादा राऊत यांच्या मिसेस व ज्येष्ठ गायिका विशाखा ताई राऊत यांच्या हस्ते समाज रत्न पुरस्कार भिम शाहिर धम्मायन कांबळे यांना देण्यात आला यावेळी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम बापू भोसले, सरपंच बालाजी सूर्यवंशी, चेअरमन मधुकर भोसले, संजय भोसले, माजी सरपंच शेषेराव गायकवाड, अनेक मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.