*गटविकास अधिकारी साहेब चलबुर्गा आदर्श वस्तीमध्ये पाणी उपलब्ध करुन द्या*
*औसा* : तालुक्यातील चलबुर्गा येथील आदर्श वस्तीमध्ये पाणी उपलब्ध करा या मागणीसाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना चलबुर्गा येथील आदर्श वस्तीतील ग्रामस्थांनी निवेदन सादर केले आहे. या निवेदनाचे सविस्तर वृत्त असे औसा तालुक्यातील चलबुर्गा गावातील आदर्श वस्तीतील ग्रामस्थ गेल्या दोन महिन्यांपासून पाण्यापासून वंचित आहेत. ग्रामस्थांनी सातत्यांने चलबुर्गा ग्रामपंचायतशी संपर्क साधून चर्चा विनिमय करून देखील ग्रामपंचायत आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. गावात पाणी पुरवठ्यासाठी 3 विहीरी 2 बोअर असून देखील ऐन उन्हाळ्याच्या झळा सुरू असतानाच पाण्याची दुदैवी अवस्था असेल तर पुढे येणारा काळ किती भयावह असेल.
चलबुर्गा ग्रामस्थ आपणास आमच्या आदर्श वस्तीला त्वरित पाणी उपलब्ध करून देण्यात यावे, अन्यथा आम्ही आपल्या पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे चलबुर्गा येथील आदर्श वस्तीतील ग्रामस्थांनी दिनांक १७ मार्च २०२२ गुरुवार रोजी औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले आहे. यावेळी या निवेदनावर प्रमोद परिहार, श्रीमंत सुरवसे, हणमंत मोरे, निलेश मोरे, प्रल्हाद मोरे, शिवाजी मोरे, विशाल मोरे, रतन पवार, महेश परिहार, भास्कर परिहार, राहुल जाधव, दिगंबर बके, ज्ञानेश्वर मोरे, विठ्ठलराव मोरे, दत्तात्रय गावलगद्दे, दिगंबर तौर, शरद मोरे, व्यंकट परिहार, राजेंद्र पुरी,दिलीप कांबळे आदिच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.