एस बी आय कडून जल सवंर्धन कामाची पाहणी
औसा प्रतिनिधी औसा तालुक्यातील माळकोंडजी व माळुंब्रा येथे एस बी आय जनरल इन्शुरन्स व दिलासा जनविकास प्रतिष्ठान औरंगाबाद यांच्या समन्वयाने सामाजिक दायित्व निधीतून शिवारात सिमेंट बंधारे, माती नाला बांध, एल बी एस, गाळ काढणे आदी जलसंधारणाची कामे झाली आहेत.या कामाचे एस बी आय जनरल इन्शुरन्स चे डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर आनंद पेजावर,शेफाली खालसा हेड कार्पोरेट कॅमुनिकेशन,जयिता नहा सीएसआर मॅनेजर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले .तसेच गावकऱ्यांशी संवाद साधले व पाहणी करून समाधान व्यक्त केले .यावेळी दिलासाचे मोशिन अहमद, प्रविण निकम,विलास राठोड,रामनाथ साबळे,श्रीमंत राठोड,बापू कदम, माळकोंडजी चे सरपंच जगन्नाथ माळी,उपसरपंच व्यंकट,जगताप,ग्रामसेवक वाघल गावे,उध्दव जगताप ,संदीप जगताप,विनोद माळी,संजय धोत्रे,पत्रकार विलास तपासे, माळुंब्राच्या सरपंच शकुंतला कदम,आणासाहेब कदम,धनराज क्षीरसागर,ग्रामसेवक बि एस पाटील,सचिन पवार,नरहरी क्षीरसागर,गोविंद क्षीरसागर,तात्याराव कदम,तुकाराम कदम आदी ग्रामस्थ उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलासाचे विलास राठोड यांनी केले तर आभार प्रविण निकम यांनी मांडले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.